वर्षांनुवष्रे भारतात ज्वारीची भाकरी आवडीने खाल्ली जात असली तरी हे मूळ पीक आफ्रिकेतील आहे. भारतात याची लागवड सुरू झाली व येथील हवामानाला पोषक असे पीक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले. खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो. सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे, मात्र उत्पादनात आपला क्रमांक दुसरा आहे.

११ टक्के जमिनीच्या क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. ६५ टक्के खरीप तर ३५ टक्के रब्बीचे क्षेत्र असते. खरीप ज्वारीत संकरीत व सुधारित वाण मोठय़ा प्रमाणावर आल्यामुळे खरिपाचे उत्पादन सर्वाधिक होते. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. एकूण ज्वारीच्या क्षेत्रापकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात असून ५७ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू प्रांतांतही ज्वारीचा पेरा केला जातो. सुमारे ५५ लाख हेक्टरवर ज्वारीचे क्षेत्र आहे व एकूण ४० लाख टन उत्पादन आहे. दर हेक्टरी १० क्विंटलच्या आसपास ज्वारीचे उत्पादन होते. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हय़ाचा नंबर पहिला असून त्यानंतर अहमदनगर पुणे जिल्हय़ात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात नांदेड व लातूर जिल्हय़ात सर्वाधिक ज्वारी घेतली जाते. रब्बी हंगामातील शाळू जातीची ज्वारी सोलापूर जिल्हय़ातील बार्शी तालुक्यात घेतली जाते व तिला राज्यातील सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला आहे.

22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
Heavy rain expected in the next 24 hours
येत्या २४ तासात मुसळधार पावसाची हजेरी, आठवड्याची अखेरही पावसानेच

ज्वारीत प्रथिनांचे प्रमाण १० ते १२ टक्के असते. उष्ण हवामानात येणारे हे पीक असून या पिकाला थंडी सहन होत नाही. अति थंडी असेल तर चिकटय़ा रोगाला सामोरे जावे लागते. काळी, मध्यम, तांबडी याचबरोबर निचरा होणारी जमीन लाभदायी असते. कमी पावसात, कोरडवाहू जमिनीत हे पीक येते. ४५ बाय २० सें.मी. अंतराने ज्वारीचा पेरा केला पाहिजे. हेक्टरी १० ते  २ किलो बियाणे वापरले पाहिजे. रब्बी हंगामातही ज्वारीच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. संकरित सीएसएम ८, १३, १५ सुधारित स्वाती एसपीव्ही ५०४, ८३, ८३९, हलक्या जमिनीसाठी सिलेक्शन ३, फुले माऊली, अनुराधा, आरएसयू ४५८ या जाती आहेत. सोलापूर जिल्हय़ातील मोहोळ येथील ज्वारी कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेली मालदांडी, एम ३५-१ ही जातही मोठय़ा प्रमाणावर शेतकरी घेतात. ज्वारीचे एका हेक्टरमध्ये १.८ ते २.५ लाख रोपे असतात. १०० ते १२० दिवस याचा कालावधी असतो व उत्पादन २० ते २५ क्विंटल ज्वारीचे होते व ५० ते ६० क्विंटल चारा होतो. ज्वारीचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी पिकातील आंतरमशागत आवश्यक असून तणाचा नाश केला पाहिजे. पेरणीच्या वेळी जमिनीत वापसा व्हायला हवा अन्यथा बियाणे कुजण्याची शक्यता असते.

रब्बी ज्वारीची पेरणी ५ सप्टेंबरपासून १५ सप्टेंबपर्यंत केली जाते. सोलापूर जिल्हय़ातील बार्शी येथील रामचंद्र जोशी या शेतकऱ्याने कोरडवाहू शेतीत ७ ते ८ क्विंटल तर बागायती शेतीत १० क्विंटलपेक्षा एकरी अधिक उत्पादन घेतले आहे. बार्शी परिसरात ‘ज्युट’ हे लोकल वाण अधिक प्रचलित आहे. संशोधित मालदांडी वाणाचे उत्पादन अधिक असले तरी बाजारपेठेत ज्युट वाणाला सर्वाधिक भाव मिळतो. यावर्षी पेरणीच्या काळात ३२०० ते ३४०० रुपये क्विंटल असा भाव मिळत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

एकेकाळी गरिबाघरी खाल्ली जाणारी ज्वारीची भाकरी आता श्रीमंतांच्या घरात दिमाखात विराजमान झाली आहे. इतर पिकाच्या तुलनेत अद्याप चांगला भाव मिळत नाही हेच ज्वारीचे कमी उत्पादन घेण्याचे मुख्य कारण आहे. ज्याप्रमाणे श्रीमंतांच्या घरात ज्वारीला मानाचे स्थान मिळते आहे त्याप्रमाणे तांदळासारखी किंमत मिळाल्यास ज्वारीचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल.

pradeepnanandkar@gmail.com