उपलब्ध शेतीत अधिकाधिक पिके घेतली तर शेतकऱ्याला सुखाने जगता येते, याचा वस्तुपाठ कणेरी मठाने घालून दिलाय. फक्त एक एकर शेतीत तब्बल १८८ पिके घेण्याचे अविश्वसनीय कार्य येथे यशस्वीपणे पार पडले आहे. कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी ही संकल्पना राबविली आहे. अल्पभूधारकांसाठी एक नवी उमेद जागृत करणाऱ्या या प्रयोगातून नियोजनबद्ध शेतीचे एक अनोखे प्रारूप (मॉडेल) तयार केले आहे.

लोकसंख्या वाढत गेली अन् वाढत्या कुटुंबाच्या प्रमाणात वाटय़ाला येणाऱ्या पिकाऊ शेतीचे क्षेत्र कमी-कमी होत गेले. अल्प शेती क्षेत्रात कुटुंबाची गुजराण करणे शेतकऱ्यांना कष्टदायक बनत गेले. आहे तितक्या शेतीत अधिकाधिक पिके घेतली तर यावर मात करून सुखाने जगता येते, याचा वस्तुपाठ कणेरी मठाने घालून दिलाय. फक्त एक एकर शेतीत तब्बल १८८ पिके घेण्याचे अविश्वसनीय कार्य येथे यशस्वीपणे पार पडले आहे. कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले आहे. अल्पभूधारकांसाठी एक नवी उमेद जागृत करणाऱ्या या अनोख्या प्रयोगातून नियोजनबद्ध शेतीचे एक अनोखे प्रारूप (मॉडेल) तयार केले आहे. बळीराजाने हतबल न होता या नियोजनबद्ध शेतीची कास धरली तर त्याच्या कुटुंबाला अन्यत्र कोठेही कामाला जावे जाणार नाही की त्याच्या शेतात बाहेरचा मजूर आणण्याची आवश्यकताही भासणार नाही. स्वाभिमानी, स्वावलंबी कुटुंबासाठी स्वावलंबी लखपती शेती असे या शेतीला नाव देण्यात आले आहे. वर्षभरात चार जणांच्या कुटुंबाला एक एकरातून घरचा खर्च जाऊन एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न राहू शकते, हे या प्रयोगामधून शक्य होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम राज्यभर विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेची दिशा देणारा उपक्रम आता खेडोपाडय़ातील बांधावर साकारताना दिसेल. काही शेतकऱ्यांनी याचा कित्ता गिरवण्यास सुरुवातही केली आहे.

What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण
contract farming
शेतमजूर ते शेतकरी!
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण

शेती करायची तर अडचणी मोठय़ा. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट. खत, वीज, बियाणे, पाणीपुरवठा, शेतीमालाला हमीभाव, शेतमजूर, आधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव अशा अनेक समस्यांवर मात करीत शेती करताना शेतकरी हतबल होऊन जातो. दुसरीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वाटय़ाला येणारे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. अशा स्थितीत त्याला कमी क्षेत्रात, कमी खर्चात, घरच्या घरी शेती करता यावी यासाठी काय करावे लागेल, असा विचार काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केला. १४०० वर्षांची परंपरा असलेल्या कणेरी येथील मठात लोकांचे मूलभूत प्रश्न कसे सोडवता येतील, याचा प्राधान्याने विचार केला जातो. हाच विचार पुढे नेत, किंबहुना त्याला आकार देत काडसिद्धेश्वर महाराज यांनी एका एकरातील लखपती शेतीचा उपक्रम यशस्वी केला आहे. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला न मिळणारा हमीभाव आणि त्यातून शेतकऱ्यांची होत असलेली आíथक कुचंबना, आत्महत्यांचे वाढते प्रमाण या साऱ्या पाश्र्वभूमीवर हा प्रकल्प महत्वपूर्ण बनला आहे. एका पूर्ण कुटुंबाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भाज्या, फळे, फुले आणि मसालेही या शेतात पिकवले गेले. शेतातील भाज्या आणि फुले विकून शेतकरी वर्षांकाठी दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळवू शकतो. कमी पाण्यात ही सेंद्रिय शेती करता येत असल्याने शेतकऱ्याला स्वावलंबी बनवणारा हा प्रयोग आहे. राज्यातील काही भागाला दुष्काळाच्या झळा वारंवार बसत असतात. पाण्याअभावी दुष्काळाचा फटका वाढतो आहे. उपलब्ध पाणी आणि उपलब्ध शेतीमध्ये योग्य नियोजन यातून कुटुंबाच्या गरजा भागवून काही पसे शिल्लक ठेवता येणारी अशी ही लखपती शेती नेमकी आहे तरी कशी, ते पाहू या.

बाहेरून फक्त कपडे, मीठ, चप्पल, साबण आणि काडेपेटी घेऊन येथे जायचे आणि अशी शेती करून सुखी व्हायचे असा मंत्र देणारी ही शेती. या शेतीसाठी आणि घरासाठी दररोज वीस हजार लिटर पाणी वापरले जाते. पुरेसे पाणी नसेल तर एक कूपनलिका खोदली पाहिजे. शेतामध्ये आच्छादन वापरून आणखी काटकसरीने पाणी वापरले तर अगदी निम्म्यावर पाण्याचा वापर येईल. दूध, खत आणि इंधन (बायोगॅस) यासाठी एक देशी गाय हवी. जागेचा पुरेपूर वापर हे या शेतीचे वैशिष्टय़. घरच्या दोन व्यक्ती दररोज या शेतात राबल्यास ही शेती कशी फायदेशीर होऊ शकते. एका एकरातील विशिष्ट जागा विशिष्ट गोष्टींसाठी निश्चित करूनच हा प्रकल्प साकारला आहे. एक एकर क्षेत्रात घर, गोठा, शौचालय, गोबरगॅस, परसबाग, शेळी, मेंढी, कोंबडी पालन, ऊस, सोयाबीन, स्टीव्हिया, झेंडू, अ‍ॅस्टर, गलाटा यांसारखी नगदी पिके, चाऱ्यासाठी विविध पिके, भाजीपाला, कंदवर्गीय, फळवर्गीय, पर्णवर्गीय, वेलवर्गीय पिके घेण्यात आली आहेत. फुले आणि भाज्या विकून या कुटुंबाला दिवसाला किमान चारशे ते पाचशे रुपये मिळतील, अशी व्यवस्था या प्रकल्पात आहे. सर्व प्रकारच्या धान्यांपासून ते सर्व प्रकारच्या पालेभाज्या, डाळी, विविध प्रकारचे भोपळे असे वेलवर्गीय आणि कंदवर्गीय पिकांचाही येथे समावेश आहे. बीटपासून ते पूजेसाठी लागणाऱ्या विविध फुलांचीही येथे लागवड केली आहे. शेतकऱ्याला दैनंदिन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी करून त्याप्रमाणे सर्व वस्तू या शेतात पिकवल्या जात आहेत. तीन वष्रे सलग पीक देणारी तूर, घरात टांगलेले भोपळे, मक्याची कणसे, वांगी, स्ट्रॉबेरी असे वेगळेपण इथे दिसते. केवळ दहा गुंठय़ात ३६ टन ऊस पिकवला जातो. उसापासून सेंद्रिय गूळ बनवला तर त्याला चांगला दर मिळतो. रासायनिक खते आणि औषधांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. नसíगक पद्धतीने पुरेशा भाज्या, फळे आणि त्यापासून उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

खेडय़ातील प्रत्येक कुटुंबाने अशा पद्धतीची शेती आत्मसात केली, तर नक्कीच ते आíथकदृष्टय़ा सक्षम होतील आणि त्यातून स्वयंपूर्ण खेडय़ांची संकल्पनाही सत्यात उतरेल, या उद्देशाने हा प्रकल्प साकारला आहे. केवळ उत्पन्नासाठी शेती न करता स्वत: गरजाही त्यातून भागाव्यात या उद्देशाने शेती केली तरीही यातून नफा राहू शकतो. एका एकरात इतकी पिके घेता येऊ शकतात. त्यातून शेतीची एक नवी उमेद फुलविण्याचा प्रयत्न काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे. कणेरी येथे झालेल्या भारतीय संस्कृती उत्सवाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग राज्यभर विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला. हा प्रकल्प राज्यभर राबविला गेल्यास आणि शासकीय मदत मिळाल्यास शेतकऱ्याला नियोजनबद्ध शेतीतून अधिक नफा मिळविता येणे शक्य होणार आहे.

लखपती शेतीत तब्बल १८८ पिके घेतली जातात ती पुढीलप्रमाणे- कंदवर्गीय भाज्या- १६, धान्यपिके- २०, फळवर्गीय भाज्या- १३, फळझाडे- २०, फुलझाडे- १०, वेलवर्गीय भाज्या- १७, पर्णवर्गीय भाज्या- १८, मसालावर्गीय पिके- १२, चारा पिके- ७, औषधी वनस्पती- ११, इतर उपयोगी झाडे, पिके, वेली- ४०, कलम- ४.

भाज्यांनी लगडलेले बॅरेल

शेतात पडून राहणाऱ्या बॅरेलचा उत्तम वापर येथे केला आहे. एका बॅरेलात किमान वीसहून अधिक भाज्यांचे पीक घेता येतात. एका कुटुंबाने घरीच भाज्या पिकवून त्याचा वापर करायचा ठरवले, तर ते कसे शक्य आहे ते एक भाज्यांनी लगडलेला बॅरेल दाखवून देतो. वीसहून अधिक ठिकाणी या बॅरेलला विविध ठिकाणी काप दिले असून, प्रत्येक कापात एक भाजी घेता येते.

dayanandlipare@gmail.com

((  कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठात एक एकरात विविध पिके घेऊन शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आसपासच्या भागांतील शेतकरीही या प्रयोगाचे अनुकरण करत आहेत.     ))