नवरात्र सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. घटस्थापनेपासून नवरात्रीची सुरुवात होते. आश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेला देवीचे आगमन होते. घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तर विजयादशमीच्या मुहूर्तावर हे घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते. यंदा १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे तर २४ ऑक्टोबरला दसऱ्याचा मुहूर्त आहे. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की,देवी ही ऊर्जा, शक्ती व स्फूर्तीचे प्रतीक आहे. आपण हा सण साजरा करतो वाईटाचा नाश आणि चांगल्याची सुरुवात करण्यासाठी. त्यामुळे आपल्यात जी ऊर्जा, स्फूर्ती, उत्साह व आनंद तयार होतो तो सजावटीमधूनसुद्धा दिसणे देखील आवश्यक आहे. सोशल मिडियावर अनेक कलाकार, इन्फ्लुएन्सर साधे सोपे आणि सुंदर अशा डेकोरेशन थीमचे व्हिडीओ शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवरील एका अकाऊंटवर नवरात्रीसाठी कोणत्या प्रकारचे डेकोरेशन करता येऊ शकते याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तर तो व्हिडीओ नक्की काय आहे आणि त्यात कशाप्रकारे सजावट करण्यात आली आहे ते जाणून घेऊयात.

नवरात्रामध्ये सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात देवीचे आगमन केले जाते. यानिमित्ताने अनेक जण वेगेवगेळ्या प्रकारचे डेकोरेशन करत असतात. इन्स्टाग्रामच्या एका अकाउंटवरून युजरने घरच्या घरी तयार केलेल्या डेकोरेशनचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. डेकोरेशनसाठी पेपर प्लेट्स, कार्ड पेपर, लाकडी चक्र आणि अन्य साहित्याचा वापर केला आहे.

हेही वाचा : धान्यांची रांगोळी अन् ..

हा व्हिडीओ जर का तुम्ही पहिला तर यामध्ये डेकोरेशनसाठी पेपर प्लेट्स, वेगवगेळे रंग आणि कार्ड पेपर अशा साहित्याचा वापर केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा खूप साऱ्या पेपर प्लेट्स घेण्यात आल्या असून त्या प्लेट्सना वेगवगेळ्या रंगाने रंगवण्यात आले आहे. यासाठी त्यात पिवळा,निळा आणि अन्य रंगाचा वापर करण्यात आला आहे.

तसेच यात डेकोरेशन करण्यासाठी कार्ड पेपर आणि लाकडी गोल चक्राचा वापर करण्यात आला आहे. गोलाकार लाकडी चक्रावर त्या आकारात आकाशी रंगाचा कार्डपेपर कापून चिकटवलेला दिसत आहे. तसेच ज्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाणार आहे त्या ठिकाणी हे गोलाकार चक्र लावलेले दिसत आहे. तसेच या चक्रावर पेपर प्लेट्स चिकटवली आहे. त्या गोलाकार चक्राला लेस देखील लावली आहे. त्यामुळे हे खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर गोलाकार चक्राच्या बाजूने वेगवेगळ्या रंगाने रंगवलेल्या पेपर प्लेट्स देखील लावण्यात आल्या आहेत. तसेच देवीच्या स्थापनेसाठी त्या चक्रासमोर एक सुंदर असा चौरंग ठेवण्यात आला आहे. हे डेकोरेशन ज्या भिंतीवर करण्यात आले ती भिंत पांढऱ्या रंगाची असल्याने हे डेकोरेशन अधिक आकर्षक दिसत आहे. थोडक्यात काय तर पेपर प्लेट्स आणि इतर सोप्या साहित्याच्या मदतीने सुंदर असे डेकोरेशन नवरात्रीमध्ये करता येऊ शकते हे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य देखील सहज उपलब्ध होत असल्याने तुम्ही देखील या प्रकारचे डेकोरेशन नवरात्रीमध्ये करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @Bikhre_rang या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून या डेकोरेशन थीमचे कौतुक करत आहेत.