सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत मिळतात. जिल्ह्यात अशा विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७४ हजार १६ असून, पुस्तकांची मागणी ९ लाख ९६ हजार ८४९ आहे. पहिल्या टप्यात ६ लाख ३ हजार ९०७ पुस्तके जि. प. शिक्षण विभागाला प्राप्त झाली. मुख्याध्यापकांना पुस्तक वाटप करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने जि. प. व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. जिल्ह्यात जि. प. च्या १ हजार २०४, तर ८६८ खासगी अनुदानित शाळा आहेत. जि. प. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार १६ विद्यार्थ्यांसाठी ९ लाख ९६ हजार ८४९ पुस्तकांची मागणी केली. पहिल्या टप्यात ६ लाख ३ हजार ९०७ पुस्तके प्राप्त झाली. जिल्हा शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांमध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, गणित व इंग्रजी, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास व विज्ञान, सहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, इतिहास, विज्ञान, भूगोल, नागरिक शास्त्र, सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान, आठवीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे पुस्तकमिळणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विद्यालयातून मंगळवारी ११ केंद्रीय मुख्याध्यापकांना पुस्तकांचे वितरण केल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात संख्या
तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या, मागणी केलेली व प्राप्त पुस्तके : िहगोली ३८ हजार ३६० विद्यार्थी, २ लाख २१ हजार १५७ व १ लाख २१ हजार ५३८. सेनगाव २९ हजार ५८४, १ लाख ६६ हजार ७३३ व १ लाख २१ हजार ६८४. वसमत ४३ हजार ८४०, २ लाख ५० हजार ८२७ व १ लाख २१ हजार ५८६. कळमनुरी ३४ हजार ९८४, १ लाख ९९ हजार २७० व १ लाख २३ हजार २७२. औंढा नागनाथ २७ हजार २४८, १ लाख ५८ हजार ८६२ व १ लाख १५ हजार ८२७. पहिल्या टप्यात एकूण ६ लाख ३ हजार ९०७ पुस्तके प्राप्त.

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक