04 March 2021

News Flash

नांदेडला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; यवतमाळमध्ये अपघातात १० ठार

यवतमाळ- नांदेड मार्गावर कोसदनी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पंजाबमधील एक कुटुंब चार कारमधून नांदेडला दर्शनासाठी जात होते.

देवदर्शनासाठी नांदेडला जाणाऱ्या कुटुंबाचा यवतमाळमध्ये अपघातात मृत्यू झाला. यवतमाळ- नांदेड मार्गावर कोसदनी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेले कुटुंब हे पंजाबचे रहिवासी असल्याचे समजते.

पंजाबमधील एक कुटुंब चार कारमधून नांदेडला दर्शनासाठी जात होते. यवतमाळ- नांदेड मार्गावर कोसदनी घाटात यातील एका कारला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात १०  जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 7:28 am

Web Title: 10 killed and several injured in truck car accident on yavatmal nanded highway
Next Stories
1 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरही अपयशाचा शिक्का!
2 विदर्भ भाजपचा गड असल्याच्या फुग्याला टाचणी
3 वादग्रस्त अ‍ॅक्युपंक्चर, इलेक्ट्रोपथीचे अभ्यासक्रम सरकारमान्य
Just Now!
X