मीरारोड परिसरात एका इसमाला त्याच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली तीन ठगांनी ११ लाखाहून अधिकचा गंडा घातला आहे. या संदर्भात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
होलीक्रॉस मीरारोड पूर्व परिसरात राहणाऱ्या एका ५३ वर्षीय इसमाचे त्याच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न सुरू होते. दरम्यान त्यांच्या मुलीची ओळख ब्रिजेश कुमार (२५), विक्रांत सिंह (३०), शिवानी (२०), यांच्याशी झाली या तिघांनी आपापसात संगनमत करून त्या मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी त्यांनी मुलीच्या वडिलांकडून बँक खात्याद्वारे ५ लाख ५० हजार आणि रोख ६ लाख रुपये घेतले. पण पैसे घेऊनही काम होत नसल्याने मुलीच्या वडिलांनी काम करण्याचा तगादा लावला. यानंतर तिघांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे बंद केल्याने मुलीच्या वडिलांनी पोलीसात तक्रार नोंदवली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 12:05 am