महाराष्ट्रात ११ हजार ५१४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३१६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात करोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. यापैकी ३ लाख १६ हजार ३७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर महाराष्ट्रात १ लाख ४६ हजार ३०५ केसेस अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन १६ हजार ७९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३.५० टक्के झाला आहे. आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या २४ लाख ८७ हजार ९९० पैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ९ लाख ७६ हजार ३३२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ७६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईतील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७७ टक्के

मुंबईत ९१० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या १ लाख २० हजार १६५ इतकी झाली आहे. यापैकी २० हजार ६५२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ९२ हजार ६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत ६ हजार ६४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७७ टक्के झाला आहे.