उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात वाघांचे मृत्यूसत्र थांबत नसल्याने प्रशासनावर वन्यजीव अभ्यासकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित के ले आहे. येथे दोन वर्षांत सुमारे १२ वाघ मृत्युमुखी पडले तर अनेक वाघ बेपत्ता झाले आहेत. या घटनांची दखल वनमंत्र्यांनी देखील घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी अहवाल मागितला आहे.

स्थानिकांचा विरोध असतानाही अभयारण्य जाहीर करण्याची घाई केल्याचा त्याचा फटका उमरेड-पवनी-करांडला अभयारण्याला सातत्याने बसत आहे. गेल्या वर्षांच्या अखेरीस गर्भवती वाघिणीचा मृत्यू झाला. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी पुन्हा तीन बछडय़ांसह वाघिणीचा मृत्यू झाला.

पवनी वनक्षेत्रातील चिचगाव बीटमध्ये दोन वाघ मृत्युमुखी पडले. डिसेंबर २०१८ मध्ये पवनी वनक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाला तर सप्टेंबर २०२० मध्येही कु ही वन्यजीव क्षेत्रात एक वाघ मृतावस्थेत आढळला. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि नागझिरा अभयारण्याच्या मध्यात हे अभयारण्य आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेने या अभयारण्याच्या कॉरिडॉरमध्ये समस्या असल्याचे तसेच अभयारण्यातील वन्यजीवांना वीजप्रवाहाचा धोका असल्याचे अहवालात सांगितले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून या अभयारण्यासह नागझिरा अभयारण्यातही वाघ आले आहेत. मात्र, स्थलांतर करून येणाऱ्या वाघांचे भ्रमणमार्ग सुरक्षित नाहीत. गावांच्या सीमा लागून असल्याने वीजप्रवाहाचा धोका कायम आहे. अभयारण्य प्रशासनाचयिी दुर्लक्षामुळे वाघांचे मृत्यू आणि बेपत्ता होणाऱ्या वाघांची संख्या या अभयारण्यात वाढत आहे.

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यातून एप्रिल २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारा ‘जय’ हा वाघ बेपत्ता झाला. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाला याचे काम देण्यात आले. मात्र या तपासणी अहवालाचे काय झाले, हे कु णालाही ठाऊक नाही. ‘जय’ वाघाचा बछडा ‘जयचंद’ याच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह कायमच आहे.

‘त्या’ वाघिणीचा मृत्यू विषप्रयोगानेच

एक जानेवारीला उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले होते. शनिवारी तिसऱ्या बछडा याठिकाणी मृतावस्थेत आढळला. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कॉरिडॉर, वीज प्रवाह, गवताळ प्रदेश, संरक्षण या चार गोष्टींवर अभयारण्य प्रशासनाने काम करणे आवश्यक असताना ते आजतागायत झालेले नाही. त्यामुळे येथे वाघ येतात, स्थिरावतात, पण मानव-वन्यजीव संघर्षांत त्यांचा मृत्यू होतो. अभयारण्य प्रशासनाने या चार गोष्टींवर काम के ले तर येथे वाघही स्थिरावतील आणि देशातील एक उत्कृष्ट अभयारण्य म्हणून उमरेड-पवनी-करांडलाचे नाव समोर येईल. – विनित अरोरा, वन्यजीव अभ्यासक.