News Flash

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळले 125 नवे करोना पॉझिटिव्ह

करोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 961 वर

प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद शहरातील करोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी औरंगाबादमध्ये 125 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. याचबरोबर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 3 हजार 961 वर पोहचली आहे.

आज आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 87 जण शहरातील तर 38 जण ग्रामीण भागातील आहे. यामध्ये 50 महिला व 75 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 136 रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. तर, 206 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीस 1 हजार 619 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज आढळेलेल्या रुग्णांमध्ये कुतुबपुरा (1), नागसेन नगर (1), बंजारा कॉलनी (1), सराफा रोड (2), व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क (1), पडेगाव (1), संभाजी कॉलनी, एन सहा (1), विद्या रेसिडेन्सी (1), जुना बाजार, नारायण नगर (1), पुंडलिक नगर (2), पद्मपुरा (1), इटखेडा (1), विष्णू नगर (1), सादात नगर (1), उल्का नगरी (1), संत तुकोबा नगर, एन दोन, सिडको (1), न्यू हनुमान नगर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1), जयभीम नगर, टाऊन हॉल (1), हर्ष नगर (7), संजय नगर, बायजीपुरा (4), राज नगर (1), हर्सुल जेल (4), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (2), वसंत नगर, जाधववाडी (3), नागेश्वरवाडी (1), एकता नगर, चेतना नगर (1), जाधववाडी (1), क्रांती नगर (1), म्हसोबा नगर (1), पोलिस कॉलनी (1), एन नऊ हडको (1), एन अकरा (1), एन तेरा (1), राज हाईट (1), विनायक नगर, देवळाई (2), विशाल नगर (1), गरम पाणी (3), बुढीलेन (3), गारखेडा (3), हरिचरण नगर, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रोजा बाग (2), दिल्ली गेट (6), बेगमपुरा (1), नेहरू नगर (1), जामा मस्जिद परिसर (10), मयूर पार्क (1),साई नगर, बजाज नगर (1), बजाज नगर, वाळूज (1), हिवरा (2), पळशी (1), मांडकी (4), कन्नड (1), पांढरी पिंपळगाव (1), दर्गा रोड, दारुसलाम पैठण (6), पडेगाव, गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (5), गंगापूर (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (2), हाफिज नगर, सिल्लोड(2), बिलाल नगर, सिल्लोड (5), इंदिरा नगर, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (1) भागातील कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 3:50 pm

Web Title: 125 new corona positive found in aurangabad district msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मीटर रिडींगद्वारे वीजबिल देण्यास सुरूवात; घरगुती वीजग्राहकांना हप्त्याने भरता येणार बिल
2 “तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी”; आशिष शेलारांचा सरकारला टोला
3 औरंगाबादमध्ये पट्टेदार ‘करिना’ वाघिणीचा मृत्यू; करोना चाचणीचा रिपोर्ट लवकरच येणार
Just Now!
X