महाराष्टारीत करोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट यात रोज भरच पडू लागली आहे. रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात १३४ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ११३ रुग्ण आहेत. राज्यात एकूण करोना रुग्णांची संख्या आता १८९५ वर गेली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

पुण्यात दोन महिलांचा मृत्यू, शहारातील मृतांचा आकडा ३१ वर
आज सकाळपासून पुण्यात करोनाने दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते,नअसे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात आतापर्यंत करोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या ३१ रुग्णांपैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे.

मालेगावमधील करोनाच्या रूग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्यामुळे नाशिककरांच्या टेन्शमध्ये वाढ झाली आहे. रविवारी सकाळी मालेगावमध्ये पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्यात भर म्हणून दुपारी १२ वाजता आणखी १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मालेगावात दिवसभरात १८ नवे करोचे रूग्ण आढळले आहेत. आजच्या १८ नव्या रूग्णांमुळे मालेगाताली करोना बाधितांची संख्या २७ झाली आहे. त्यापैकी मालेगाममधील एका करोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.