मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा भाजपाचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प त्वरीत तडीस नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासून प्रयत्नात आहेत. विविध अडचणींना सामोरे जात प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे काम सुरू आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी जमीन संपादित केलेल्या सुमारे ६ हजार शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यापैकी १८ टक्के शेतकऱ्यांनी प्राप्त झालेल्या मोबदल्यातून दुसरीकडे शेत जमीन घेतल्याचे समोर आले आहे.

एमएसआरडीसीने आतापर्यंत सुमारे ९४०० हेक्टर जमीन संपादित केली असून या प्रकल्पासाठी २० हजार शेतकऱ्यांना ६६०० कोटी रूपये भरपाई देण्यात आली आहे. रेडी रेकनरच्या सुमारे चार पट अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाची लांबी ही ७०० किमी इतकी आहे. याप्रकरणी सुमारे ६ हजार शेतकऱ्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यातील १८ टक्के शेतकऱ्यांनी आधीच दुसरीकडे शेतजमीन खरेदी केली आहे. तर ५० टक्के शेतकरी लवकरच जमीन घेणार आहेत, असे वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले आहे.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

६ टक्के शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. उदा. कापसाचे वजन करण्याचे मशीन, बैल, विहीर खोदणे, ठिबक सिंचन यंत्रणा, कुंपण बांधणे आदीत पैसे गुंतवले आहेत. तर १० टक्के शेतकऱ्यांनी डेअरी, कुक्कुट पालनासारख्या शेती पूरक उद्योगात पैसे गुंतवले आहेत. या सर्व्हेक्षणात असेही दिसून आले की, ४५ टक्के शेतकऱ्यांनी आलेल्या मोबदल्यात वाहतूक, अर्थ मुव्हिंग साहित्य, मुदत ठेव, म्युच्युअल फंड आणि विमा पॉलिसीत पैसे गुंतवले. यातील ७४ टक्के शेतकऱ्यांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे ठेवले आहेत.

त्वरीत जमिनीचे अधिग्रहण करणे आणि पुढील महिन्यात कामाला सुरूवात करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याचे सरकारचे नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सुमारे ४६ हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

या महामार्गावर २५ टोल प्लाझा असतील आणि ४० वर्षांसाठी टोल घेतला जाईल. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास अवघ्या ८ तासांत होईल. सध्या यासाठी १८ तास लागतात.