04 March 2021

News Flash

तासगावात १९ वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

ती ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.

पावसाअभावी वाया गेलेली पिके आणि आर्थिक विवंचनेमुळे पाटखळ (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रणाली प्रकाश पाटील असे तरुणीचे नाव असून ती मुळची वाळवा तालुक्यातील साखराळे गावची आहे.

प्रणाली शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. आज (रविवारी) सकाळी रुममध्ये कोणी नसल्याचे पाहून तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रणालीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनी आणि प्रणालीच्या रुममेट्स, शिक्षिकांकडे चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 4:48 pm

Web Title: 19 year old girl suicide in tasgaon sangli crime
Next Stories
1 सोनई तिहेरी हत्याकांड  : डीएनए, मोबाइल हेच ‘साक्षीदार’!
2 सोनई तिहेरी हत्याकांड : राज्याला हादरा देणारे हत्याकांड
3 आम आदमी पक्षाचे निलंबित आमदार पुन्हा निवडून येतील
Just Now!
X