24 September 2020

News Flash

फेसबुक लाईव्हवर आत्महत्या; जव्हारमधील धक्कादायक घटना

तरूण हॉटेलमध्ये करत होता काम

जव्हार शहरातील राममंदिर शेजारील इमारतीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरू ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. गुरूवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

वाडा तालुक्यातील वीरा येथील नवनाथ बोगे हा २२ वर्षीय तरुण जव्हार येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. तो हॉटेल मालकाच्या फ्लॅटमध्ये रहायचा. परंतु अचानक त्यानं गुरूवारी संध्याकाळी पंख्यावर गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी त्यानं आपल्या आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह केलं. त्यामुळे ही घटना कॅमेऱ्याद कैद झाली आणि सर्वांना या घटनेची माहिती मिळाली.

त्यानं आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, जव्हार पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास जव्हार पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 7:57 am

Web Title: 22 year old boy suicide facebook live maharashtra jawahar working in hotel jud 87
Next Stories
1 शासकीय रुग्णालयात करोनाबाधितांची लूट
2 वाडय़ाच्या जलविज्ञान प्रकल्प कार्यालयाला घरघर
3 बिकट परिस्थितीवर मात करून यवतमाळमधील तिघे ‘यूपीएससी’त यशस्वी
Just Now!
X