30 November 2020

News Flash

हिंगोलीत दीड वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारुन महिलेची आत्महत्या

टपाल विभागाच्या कार्यालय परिसरात एक विहीर असून या विहिरीत मंगळवारी सविता पार्डीकर (वय २५) या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

हिगोलीतील पोस्ट ऑफिस कार्यालय परिसरात एका महिलेने दीड वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. महिलेने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टपाल विभागाच्या कार्यालय परिसरात एक विहीर असून या विहिरीत मंगळवारी संध्याकाळी सविता पार्डीकर (वय २५) या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. सतर्क नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. महिलेसोबत तिचा दीड वर्षांचा मुलगाही होता, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी विहिरीत मुलाचा शोध घ्यायला सुरूवात केली. रात्री उशिरा पोलिसांना विहिरीत दीड वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला.

महिलेने आत्महत्या का केली, हे अद्याप अस्पष्ट आहे. अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या नातेवाईकांचा जबाब घेण्यात येईल, त्यांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 4:42 pm

Web Title: 25 year old woman jumps off in well with one and half year old son in hingoli
Next Stories
1 वारिस पठाण दुसऱ्या देशात असते तर काय झाले असते: नितेश राणे
2 मोदी सरकारवर निशाणा साधत राज ठाकरेंचा मनमोहन सिंगांना Happy Birthday
3 चांगली बायको मिळावी यासाठी नंदूरबारमध्ये जादूटोणा, तरुणाला विवस्त्र करुन पूजा
Just Now!
X