25 September 2020

News Flash

राज्यात २४ तासांत २६४ पोलीस करोनाबाधित, तिघांचा मृत्यू

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या ११ हजार ३९२ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे समजले जाणारे पोलीस देखील करोनाच्या विळख्यात दिवसेंदिवस अडकताना दिसत आहेत. मागील २४ तासांमध्ये राज्यात २६४ पोलीस करोनाबाधित आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२१ वर पोहचली आहे. तर, राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता ११ हजार ३९२ झाली आहे. यापैकी ९ हजार १८७ जण पूर्णपणे बरे झाले असून, २ हजार ८४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील ११ हजार ३९२ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार १७९ अधिकारी व १० हजार २१३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ८४ पोलिसांमध्ये २५७ अधिकारी व १ हजार ८२७ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या ९ हजार १८७ पोलिसांमध्ये ९११ अधिकारी व ८ हजार २७६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२१ पोलिसांमध्ये ११ अधिकारी व ११० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 4:00 pm

Web Title: 264 more maharashtra police personnel tested positive for covid19 while 3 died in the last 24 hours msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 विरार : डंपर आणि खासगी बसची समोरासमोर धडक; १५ प्रवासी जखमी
2 राज्यातील कोविड रुग्णालये कॅशलेस करा; नितेश राणे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
3 ‘हा’ फोटो ट्विट करत अवघ्या तीन शब्दांमध्ये निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा
Just Now!
X