News Flash

कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; चार ठार

मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील करोंदा नाल्यात ही बस अचानक उलटली आणि ओढ्यात पडली

कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; चार ठार
(सांकेतिक छायाचित्र)

कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या बसला अपघात झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील अन्य ४६ जण जखमी झाले आहेत. कुंभमेळ्याहून जबलपूरमार्गे येणाऱ्या बसला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. बस ओढ्यामध्ये पडल्याने हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज आहे. बसमधील प्रवासी कुंभमेळ्याला गेले होते, ते प्रयागराजहून नागपूरला येत होते. या अपघातामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून चालकाचा तोल सुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस पुढील तपास करत असून तपासाअंती नेमके कारण स्पष्ट होईल.

मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील करोंदा नाल्यात ही बस अचानक उलटली आणि अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच याठिकाणी पोलीस दाखल झाले. तसेच रुग्णवाहीका मागवण्यात आल्या. यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बसमधील भाविकांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. ही बस करोंदा नाल्याच्या पुलावरून खाली पडल्याने तिला क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. अपघात झाला तेव्हा पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी झोपेत होते. यामध्ये अनेकांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2019 6:32 pm

Web Title: 4 dead 46 injured as bus coming from kumbh mela to nagpur falls into drain in jabalpur accident
Next Stories
1 कार्यकर्त्यांबद्दलच्या अविश्वासाने पवारांकडून घरातच उमेदवारी
2 कंगाल पाकिस्तानपुढे शरणागती का?
3 निवडणूकपूर्व सर्वेक्षण करा, मगच उमेदवारी ठरवा!
Just Now!
X