देगलूरच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील औराद पासून ४ कि.मी अंतरावर असलेल्या बोरुळ येथे १४ चाकी कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटून कंटेनर हाॅटेलमध्ये घुसल्याने चार जण जागीच ठार तर एक गंभीर झाल्याची घटना दिनांक २२ डिसेंबर रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास घडल्याचा गुन्हा औराद पोलीस स्थानकात नोंद करण्यात आला.

देगलूरच्या सीमेवर असलेल्या कर्नाटकातील औराद पासून ४ कि मी अंतरावर असलेल्या बोरोळ येथे दिनांक 22 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास गाडी नंबर एम एच २४ ए यु १६३५ हा कंटेनर गुलबर्गा- शेडम येथून सिमेंटचा कच्चामाल सिमेंटच्या टाकीत भरून नांदेड – उस्माननगर- मुक्रमाबाद- बिदर या महामार्गाचे काम चालू असलेल्या चार पदरी रस्त्याच्या कामासाठी सावरमाळ तालुका मुखेड येथेआणताना चालकाच्या निष्काळजीने वाहनावरचा ताबा सुटून कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात घुसल्याने रमेश कोळी राहणार बोरूळ वय ४५ वर्ष, धनराज मडोळप्पा इंडे राहणार बोरोळ वय ५० वर्षे, रमेश जयवंतराव कप्पेखेरीकर वय ३८ वर्ष हे त्याच हॉटेलात बोलत बसले होते तर त्यांच्या सह कंटेनर चालक यांचा जागीच मृत्यू झाला तर कलप्पा मचकुरे वय ५५ वर्ष राहणार बोरूळ हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादला रवाना करण्यात आले तर कंटेनर वरील सिमेंट कच्चामाल भरून असलेली सिमेंटची टाकी बाजूला जाऊन पडली आणि कंटेनरच्या केबिनचा चेंदामेंदा झाल्याच्या घटनेची नोंद शिवकुमार धनराज एंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्थानकात कलम २७९,३३८,३०४अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश कुमार मैलूरकर व पोलीस उपनिरीक्षक नानेगौडा पाटील हे करीत आहेत.

चालकाचा ताबा सुटून कंटेनर वरील टाकी बाजूच्या पुतळ्याला आदळून कंटेनर हॉटेलात घुसला आणि कंटेनरवरील सिमेंटची टाकी पडून मोठा आवाज झाला आणि त्या चौघांचा जागीच मृत्यू झाला-
सुधीर बाबुराव पांढरे बोरुळ, ,प्रत्यक्षदर्शी