News Flash

अकोल्याजवळ अपघातात ५ ठार

टॅँकर व कारमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ वर्षीय चिमुकलीसह ५ जण ठार झाले.

बाळापूर- खामगावदरम्यान दुर्घटना, चिमुकलीचा अंत
टॅँकर व कारमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ वर्षीय चिमुकलीसह ५ जण ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बाळापूर- खामगावदरम्यान तिरोडा फाटय़ाजवळ रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
चतुर्भुज मुरलीधर कारंजावाला (४५), संगीता चतुर्भुज कारंजावाला (४०), यश चतुर्भुज कारंजावाला (सर्व रा. वापी, गुजरात), रंजना मुन्नाभाई नागर (३५, रा. बऱ्हाणपूर) व आयना मुन्नाभाई नागर (६) यांचा अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गावरील तिरोडा फाटय़ाजवळ टँकर व मारुती सुझुकी कारमध्ये जबरदस्त धडक झाली. या भीषण अपघातात कार पूर्णपणे चक्काचूर झाली व कारमधील पाचही जण जागीच ठार झाले. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस व महामार्ग वाहतूक पोलीस तत्काळ पोहोचले. अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. संगीता कारंजावाला व रंजना नागर या दोघी बहिणी मुलांसह बाळापूरला भावाकडे येत होत्या. या मार्गातच हा अपघात झाल्याने पती, पत्नी मुलासह मायलेकींचा करुण अंत झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2016 1:23 am

Web Title: 5 killed in akola accident
Next Stories
1 रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले
2 केळी निर्यातीच्या संधीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज
3 वैद्यकीय महाविद्यालयांत क्षमता समान मात्र, पदे असमान
Just Now!
X