News Flash

नागपूरमध्ये आगीत ५ जणांचा मृत्यू

गोकुळपेठ बाजारपेठेतील चार मजली अंजिक्य प्लाझा या अपार्टमेंटच्या पाíर्कगमधील वाहनांना आग लागल्यामुळे तेथे राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होऊन १३ दुचाकी वाहनेही जळून खाक

| May 24, 2014 04:00 am

गोकुळपेठ बाजारपेठेतील चार मजली अंजिक्य प्लाझा या अपार्टमेंटच्या पाíर्कगमधील वाहनांना आग लागल्यामुळे तेथे राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होऊन १३ दुचाकी वाहनेही जळून खाक झाली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.  महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. मृतांमध्ये सलीला  शिरिया (६२), रागिणी शिरिया (३२), श्रृती माली (२५) या तीन महिलांसह निरांश शिरिया (अडीच वर्ष), शहाणा माली (२) या दोन चिमुरडय़ांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 4:00 am

Web Title: 5 killed in nagpur fire
Next Stories
1 आंब्याचे भाव गडगडण्यामागेही ‘पेड न्यूज’?
2 किरकोळ कारणावरून सांगलीत तरुणाचा खून
3 कराडच्या पाणीपुरवठय़ाबाबत जपानशी सामंजस्य करार
Just Now!
X