सोलापुरात आज दिवसभरात शहर व जिल्हा ग्रामीण भागात मिळून करोनाबाधित नव्या ६० रूग्णांची भर पडली. तर एका वयोवृध्द वकिलासह तिघांचा मृत्यू झाला. एकूण रूग्णसंख्या १४१० झाली आहे, तर मृतांचा आकडा १२८ वर पोहचला आहे. मात्र त्याचवेळी करोनामुक्त झालेल्या रूग्णसंख्याही झपाट्याने वाढून ५६ टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
आज शहरात नवे ४२ तर ग्रामीण भागात १८ रूग्ण आढळतात आले. शहरातील तिघांचा मृत्यू झाला. यात एका ९० वर्षाच्या एका सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ दिवाणी वकिलाचा समावेश आहे. शहरातील एकूण करोनाबाधित रूग्णांमध्ये ७६९ पुरूष व ५४१ महिलांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील शंभर रूग्णांमध्ये ६२ पुरूष व ३८ महिला आहेत. आज दिवसभरात ४०७ वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात शहर व जिल्ह्यातील मिळून ६० रूग्ण करोनाबाधित निघाले. एकूण मृतांमध्ये शहरातील १२२ आणि ग्रामीणमधील सहा व्यक्ती आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 9:46 pm