जिल्ह्य़ात करोनाचे नवीन २७ रुग्ण आढळून आल्यामुळे जालना जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या शुक्रवारी दुपापर्यंत दोन हजार ६२३ झाली. आतापर्यंत जिल्ह्य़ात करोनामुळे ८४ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत एक हजार ६९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. एकूण १२ हजार २५६ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून नकारात्मक आलेला आहे. सध्या जिल्ह्य़ातील संस्थात्मक अलगीकरणात ४७७ व्यक्ती आहेत. करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांच्या संपर्क आणि सहवासातील २७ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा शोध आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने घेतलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील १८८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अँटिजेन चाचणी दोन दिवस करण्यात आली. त्यापैकी एक जण करोनाबाधित आढळून आला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलिसांची अँटिजेना चाचणी सध्या घेण्यात येत आहे. अँटिजेन चाचण्यांमध्ये जिल्ह्य़ात विविध भागांमध्ये आतापर्यंत २२९ व्यक्ती करोनाबधित आढळून आल्या आहेत.