रायगड जिल्ह्यात करोनग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या चोवीस तासात करोनाचे नवे ८४ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४३ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा २०६७ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा हद्दीतील ५१, पनवेल ग्रामिण मधील १७, उरण मधील ७, पेण ३, अलिबाग मधील ६ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील ५९६८ जणांची करोना चाचणी करण्यात आली असून यातील ३८६३ जणांचे अहवाल नकारात्मक आले. आतापर्यंत २०६७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले, तर ३८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. १४५१ जणांनी करोनावर मात केली आहे. पनवेल मनपा हद्दीतील २९७, पनवेल ग्रामिण हद्दीतील ८९, उरण मधील २९,  खालापूर ४, कर्जत १९, पेण २६, अलिबाग २७,  मुरुड ४, माणगाव ६, तळा येथील ०, रोहा २, सुधागड ०, श्रीवर्धन ०, म्हसळा ११, महाड ११, पोलादपूर मधील ० करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्ता पर्यंत ९१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ४२ हजार ११२ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.