19 September 2020

News Flash

पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, मुंबईचे पाच जण ठार

कारने बसला समोरून जोराची धडक दिल्यानं हा अपघात

पंढरपूर-सोलापूर महामार्गावर कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जवळील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेले पाचही जण मुंबईतील आहेत.

पंढरपूरकडे जाणारी कारने (एमएच03 AZ 3116 ) एसटी बसला धडकली. कारने बसला समोरून जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. घाटकोपर येथे रहाणारे सुरेश कोकणे आपल्या कुटुंबासह पंढरपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. कोकणे कुटुंब अक्कलकोटहून पंढरपूरला दर्शनासाठी चालले होते.

बस पंढरपूरहून अक्कलकोटला येत असताना हा भीषण अपघात घडला. अपघाताच्या आवाजानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावले पण पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना तात्काळ रूग्णालयात हलवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 6:14 pm

Web Title: a car accident on the solapur pandharpur highway 5 people killed on the spot
Next Stories
1 सचखंड एक्स्प्रेसचे इंजिन डबे सोडून धावले, थोडक्यात टळला अपघात
2 राष्ट्रवादीला धक्का, परभणीतील १३ नगरसेवकांचे राजीनामे
3 पुणे पोलिसांना हादरा; आनंद तेलतुंबडेची अटक बेकायदेशीर, न्यायालयाची चपराक
Just Now!
X