News Flash

आरोग्य अधिकाऱ्यास धमकावल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल!

वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था विरोधात हिंसक कृत्ये अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे. (संग्रहित छायाचित्र)

वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांना फोन वरून धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था विरोधात हिंसक कृत्ये अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाणेदार सत्यजित बंडेवार यांनी सांगितले आहे.

राज्यात करोनाच्या संकटामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज नवनव्या समस्यांना सामोरं जावं लागत असून, नातेवाईकांकडूनही हल्ले आणि असभ्य वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र, वर्ध्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसअधीक्षकांना तक्रार दिली आहे.

“तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ

याशिवाय, डॉ. अजय डवले यांनी याप्रकरणी पोलिसांकडेही तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरणाला वाचा फुटली. डॉ. डवले यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी निवेदन वजा तक्रार दिली आहे. ९ मे रोजी नाचन गाव येथे आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्र काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. “तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावले आहे, असं डवले यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. डवले यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 10:42 pm

Web Title: a case has been registered against mla ranjit kamble msr 87
Next Stories
1 Coronavirus : राज्यात आज ६१ हजार ६०७ रूग्ण करोनामुक्त; ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित
2 करोनाने निराधार झालेल्या बालकांना आता शासनाचा आधार!
3 नितीन गडकरींच्या हस्तक्षेपामुळे रूग्णालायस अतिरिक्त खाटांच्या परवानगीसह वैद्यकीय साहित्याची मदत
Just Now!
X