News Flash

चंद्रपूर : ताडोबाच्या बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

गाईला वाचवताना वाघाचा हल्ला

चंद्रपूर : ताडोबाच्या बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
छायाचित्र प्रातिनिधीक आहे

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघाने एका गुराख्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गुराखी जागीच ठार झाला. गुरूवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुल वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या करवन नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७६७ मध्ये हा प्रकार घडला.

रमेश भीमराव वेलादी (वय ५८) असे मृत गुराख्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मृत रमेश वेलादी हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील क्रक्ष क्रमांक ७६७ मध्ये गेले होते. दरम्यान, झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने सर्वप्रथम गाईवर हल्ला चढविला. रमेश यांच्या हे लक्षात येताच त्यांनी गाईला वाचविण्यासाठी पुढे धाव घेतली. तेव्हा वाघाने रमेश यांच्यावर हल्ला केला यात ते जागीच ठार झाले.

दरम्यान, रमेश यांच्या एका गुराखी सहकाऱ्याने घाबरून पळ काढत गाव गाठला आणि घटनेची माहिती वनविभाग आणि गावकऱ्यांना दिली. मुलचे वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांनी ताफ्यासह घटनास्थळी भेट देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2020 5:16 pm

Web Title: a cowboy killed in a tiger attack in chandrapur tadobas buffer zone aau 85
Next Stories
1 आशा सेविकांना ठाकरे सरकारकडून मोठा दिलासा; मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी
2 सलून सुरु करण्यास ठाकरे सरकारची परवानगी, जाणून घ्या सविस्तर माहिती
3 गोपीचंद पडळकरांना साताऱ्यात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा इशारा
Just Now!
X