26 September 2020

News Flash

परिवर्तनवादी विचारांनी समाजव्यवस्था बदलू शकते

परिवर्तनवादी विचारांवर विश्वास आणि स्वातंत्र्य-समता-बंधुत्व या नीतिमूल्यांवर निष्ठा असेल

नगर येथे शुक्रवारी सायंकाळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता देसाई यांना यंदाचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी पुरस्कार समितीचे अध्यक्ष उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष अरुण कडू, समन्वयक डॉ. मिलिंद कसबे आदी उपस्थित होते.

डॉ. आ. ह. साळुंखे यांचे प्रतिपादन; दत्ता देसाई यांना कॉ. पानसरे पुरस्कार प्रदान
परिवर्तनवादी विचारांवर विश्वास आणि स्वातंत्र्य-समता-बंधुत्व या नीतिमूल्यांवर निष्ठा असेल, तर समाजव्यवस्था बदलू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत शनिवारी आ. ह. साळुंखे यांनी केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक दत्ता देसाई यांना यंदाचा कॉ. गोविद पानसरे प्रबोधन पुरस्कार साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार समितीचे अध्यक्ष उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष अरूण कडू, समन्वयक डॉ. मिलिंद कसबे आदी उपस्थित होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, कॉ. पानसरे यांनी ज्या कामासाठी आयुष्य वेचले, त्या क्षेत्रातील साजेशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे. देसाई यांच्या कामाची ही पावती आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने नव्या पिढीला दोन व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा मिळेल. मागच्या पिढीने केलेले कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम जाणत्या वक्तींनी योग्य पद्धतीने केले नाही. समाजकारणात हीच मोठी उणीव आहे. कॉ. पानसरे केवळ झुंजणारे आक्रमक नेते नव्हते तर, त्यांच्या अंतरंगात हळुवारपणा जपणारा माणूसही होता. मार्क्‍सवाद सांगतानाच दुसरीकडे त्यांनी शाहू-फुले-आंबेडकर यांचाही विचार लोकांमध्ये रूजवला. त्यांच्या जन्मभूमीतच हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे, ही समाधानाची बाब आहे.ह्व
देसाई म्हणाले,ह्व मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे परिवर्तनावदी चळवळीने आपल्याच कार्यकर्त्यांच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आहे. या पुरस्काराचे मोल मोठे आहे. कॉ. पानसरे यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी वाढली आहे. या पुरस्काराने डाव्या चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान झाला आहे.ह्व या पुरस्काराच्या रकमेत पाच हजार रूपयांची भर टाकून प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत देसाई यांनी दोन संस्थांना जाहीर केली.
कडू यांनी प्रास्तविक केले. कांबळे यांचेही या वेळी भाषण झाले. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांना आदरांजली वाहण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 1:16 am

Web Title: a h salunkhe comment on society management system
Next Stories
1 पाणी मागणाऱ्या दलितांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धमकावले
2 कृषी क्षेत्रात व्यापक संशोधन करा -मुख्यमंत्री
3 सरकारला मराठा आरक्षणाची इच्छा नाही
Just Now!
X