News Flash

बिअरची वाहतूक करणारा ट्रक उलटला, लाखोंचे नुकसान

पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना

पुणे – बंगळुरू महामार्गावर उडतरे(ता.वाई) गावानजीक बिअरची वाहातूक करणारा मालट्रक उलटला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाला नाही. मात्र लाखो रुपयांची बिअर रस्तावर पाण्यासारखी वाहात होती.

गुरुवारी पुण्याहून साताराच्या दिशेने जाणाऱ्या माल ट्रक क्रमांक (एमएच ऐएल ५२५० ) च्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला व रस्त्यावर आडवा पडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही परंतु ट्रक मधील विक्रीसाठी जाणाऱ्या बिअरच्या बाटल्या फुटून लाखो रुपयांचे  नुकसान झाले.  अपघाता नंतर भुईंज पोलिसानी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. भुईंज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 10:35 pm

Web Title: a truck transporting beer overturned msr 87
Next Stories
1 उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन जण करोना पॉझिटिव्ह
2 वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बाह्य जिल्ह्यातील रुग्ण तपासणीसाठी ‘ओपीडी’
3 मुंबईवरून बुलडाणा जिल्ह्यात आलेली मुलगी करोनाबाधित
Just Now!
X