News Flash

भंडारा जिल्ह्यात जीपचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

नाकाडोंगरीजवळील राजापूर येथील वळणावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले

प्रातिनिधीक छायाचित्र

प्रवाशांना घेऊन निघालेली भरधाव जीप उलटून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर सहा गंभीर जखमी झाले. हा अपघात तुमसर ते कटंगी मार्गावरील नाकाडोंगरीजवळील राजापूर येथे मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. मृतांत दोन महिलांचा समावेश आहे.

कल्पना सरोदे (३५ रा. कवलेवाडा ता. तुमसर), अरूणा प्रकाश मोहनकर (वय ४५, रा. तुमसर) अशी मृतांची नावे आहेत. एकाची ओळख पटली नव्हती. मध्यप्रदेशातून प्रवासी घेऊन जीप (एमएच ३६ ४२४७) सकाळी तुमसरकडे येत होती. नाकाडोंगरीजवळील राजापूर येथील वळणावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात तिघे जागीच ठार झाले. तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तुमसर येथे पाठवण्यात आले. जखमींची नावे कळू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 2:48 pm

Web Title: accident in bhandara district near nakadongari rajapur 3 dead 6 injured
Next Stories
1 राज्यात 24962 मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम
2 राज्य सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा
3 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार – शरद पवार
Just Now!
X