मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर रायगडजवळ विचित्र अपघात झाला. रायगडपासून ३८ किमी अंतरावर बोरघाटात हा अपघात झाला. यामध्ये 4 जण जखमी झाले असून जखमींना खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुार, पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सर्वप्रथम शिवशाही बसने एका कंटेनरला मागून धडक दिली, त्यांच्या मागोमाग येणाऱ्या टेम्पोने शिवशाहीला मागून धडक दिली. त्यानंतर अपघातानंतर वाहने बाजूला करण्याचे काम सुरू असतानाच अचानक आणखी एका लक्झरी बसने धडक दिली. मात्र, आय. आर. बी. पेट्रोलिंग आणि डेल्टा फोर्स यांच्या सतर्कतेने वेळीच प्रवाशांना बाजूला केल्याने मोठी जीवितहानी टळली.