मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली आहे. यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एक जण अत्यवस्थ असून एकूण ४ जण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, आसपासच्या ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

…अखेर चांडगावनजीक हा ट्रक थांबला

रेवदंडा येथून हा ट्रक रोह्याच्या दिशेने वेगाने निघाला होता. साळाव आणि आमली येथे त्याने प्रत्येकी एका व्यक्तीला धडक देऊन जखमी केले. चेहेर येथे आणखीन दोघांना उडवले. या घटनेची माहिती मिळताच पुढील गावातील गावकऱ्यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अडथळे उडवून ट्रक निघून गेला. ट्रक चालकाने न्हावे फाटा इथं एका दुचाकीला धडक देत फरफटत नेले. यात दुचाकीवरून प्रवास करणारे शिक्षक लक्ष्मण ढेबे, त्यांची पत्नी रामेश्वरी ढेबे आणि मुलगा रोहित ढेबे हे तिघे ठार झाले. पुढे सारसोली इथं पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत उदय वाकडे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चौघांना ट्रकने धडक दिली. यात ते जखमी झाले. भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगाव नजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जमावाला शांत करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.