24 September 2020

News Flash

सोलापुरात ४९ नवे रूग्णांची भर; सहाजणांचा मृत्यू; रूग्णसंख्या ५६५ वर

आतापर्यंत २४९ व्यक्ती करोनामुक्त

संग्रहित छायाचित्र

सोलापुरात आज दिवसभरात करोनाबाधित ४९ नवे रूग्ण आढळून आले असून सहाजणांचा बळी गेला आहे. तर एकूण रूग्णसंख्या ५६५ वर पोहोचली आहे. मृतांचा आकडाही वाढून ४६ वर गेला आहे. मात्र आतापर्यंत २४९ व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत.

आज मृत पावलेल्या करोनाबाधितांमध्ये बहुतांशी वृध्द आहेत. दोघांचा अपवाद वगळता अन्य चार मृत ६७ वर्षे ते ७८ वर्षापर्यंतचे आहेत. पत्रा तालीम भागातील एका ७१ वर्षाच्या सेवानिवृत्त शासकीय अधिकारी करोनाचा बळी ठरला आहे. मोदीखाना, मिलिंदनगर (बुधवारपेठ) व न्यू पाच्छा पेठेतील मिळून तीन वृध्द महिलांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

आज आढळून आलेल्या ४९ रूग्णांमध्ये २२ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, आज रूग्णालयातून करोनामुक्त होऊन २५ रूग्ण घरी परतले. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या २४९ एवढी असून सध्या २७० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 10:39 pm

Web Title: addition of 49 new patients in solapur abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : महात्मा फुले जन-आरोग्य योजनेंतर्गत आता सर्वांना उपचार!
2 महाराष्ट्रात २६०८ नवे करोनारुग्ण, ६० मृत्यू, संख्या ४७ हजारांच्याही पुढे
3 अकोल्यात आणखी २३ रुग्णांची वाढ, एकूण संख्या ३७० च्याही पुढे
Just Now!
X