जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये आजी-माजी सरपंचासह ग्रामसेवकांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीअंती उघड झाले. मात्र, अपहाराची रक्कम अजूनही वसूल होत नसल्यामुळे जि.प. प्रशासनासमोर अपहाराची रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अपहाराच्या रकमेचा बोजा सरपंचांच्या सात-बारावर टाकणे अथवा त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीतील आíथक व्यवहारात ग्रा.पं. मालमत्तेचे मोठे नुकसान करून विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले. यात काही ग्रामपंचायतींचे सरपंच मृत, तर काही पदांवर नसल्यामुळे अपहाराची रक्कम वसूल करण्यात जि.प. प्रशासनाला आतापर्यंत अपयश आले. मात्र, या दृष्टीने प्रयत्न केले गेले नसल्याची जिल्हाभर चर्चा आहे. माळसेलूचे माजी सरपंच राजेश्वर वामन यांनी ग्रामपंचायतीत ४४ हजार २७६ रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत पुढे आले. जामठी खुर्द येथील माजी सरपंच भिकाजी झंवर ५० हजार ६४२, बळसोंड सरपंच ताईबाई शिखरे १० लाख ११ हजार ६४८, कारवाडी सरपंच सय्यद बॉक्सर सय्यद फतरू ३ लाख ४६ हजार २३८, मालवाडी माजी सरपंच पांडुरंग बुद्रुक ८६ हजार ५००, राहुली खुर्द सरपंच रंजना खोंडे ८० हजार, सिरसम बुद्रुक माजी सरपंच मुंजाप्पा वऱ्हाडे १ लाख ८९ हजार १६९, कलगाव माजी सरपंच मंदाबाई वाघमारे ५९ हजार रुपये, ब्राह्मणवाडा सरपंच बाबुलाल जाधव ३६ हजार ८३०, सारंगवाडी सरपंच शिवाजी कुरुडे १४ हजार ८६०, नागेशवाडी सरपंच गंगाधार कऱ्हाळे ७ हजार ९९७, असोला सरपंच माधवराव बुलाखे ४ हजार १८६, सुरेगाव सरपंच शितला पोले १ लाख ३३ हजार ६०८, वसमत तालुक्यातील आरळच्या माजी सरपंच ज्योती गायकवाड ७० हजार ६७७, कोडगाव माजी सरपंच शारदा सोनवणे ९१ हजार, लोळेश्वर माजी सरपंच पुंडलिक पांडुरंग कदम ३३ हजार ९१४, कानोसा सरपंच जेठणे केशवराव बळे ७६ हजार १५०, औंढा तालुक्यातील नालेगाव सरपंच गोिवदा सीताराम पांडववीर ४१ हजार ३०७, पोटा बुद्रुक ग्रामसेवक टी. डी. पांचाळ ४८ हजार ५०१ रुपये आदी अपहाराची प्रकरणे समोर आली आहेत.