जागतिकीकरण आणि जमातवाद फोफावत चालले असून त्यामुळे देशसमोर मोठा धोका निर्माण होत आहे. इंदिरा गांधींच्या काळात देशाने आणीबाणीचे चटके अनुभवले. या संदर्भात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केलेली भीती योग्यच आहे, असे उद्गार ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी काढले.
राजर्षी शाहू यांच्या ३० व्या जयंतीनिमित्त येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे तिसावा शाहू पुरस्कार ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते  वैद्य यांना देण्यात आला.
पानसरे यांच्या आठवणी सांगताना भाई  म्हणाले, आज एन.डी. आणि मी जुळी भावंडे या पुरस्काराच्या निमित्ताने एकत्र आलो आहे. त्या वेळी माझी नजर समोर एकास धुंडाळत आहे, ती म्हणजे गोिवद पानसरे यांच्या शोधासाठी. त्यांच्या जाण्याची सल आहे. त्यांचे विचार पुढे नेले पाहिजेत, असे आवाहन भाई वैद्य यांनी या वेळी केले.