सुप्रीम कोर्टाने कर्नाटक विधानसभेत शनिवारी संध्याकाळी चार वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश भाजप दिले होते. मात्र बहुमत चाचणीआधीच येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार कोसळले. त्यामुळे पुण्यात काँग्रेस पक्षाकडून लाडू आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

कर्नाटक राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत 104 जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण सत्तेस्थापनेसाठी आवश्यक असलेले 111 चे संख्याबळ त्यांच्याकडे नव्हते. दुसरीकडे काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षाने  निवडणुकोत्तर युती केल्याने त्यांचे संख्याबळ 115 वर पोहोचले. त्यामुळे भाजपासाठी बहुमत चाचणीत विजय मिळवणे कठीण होते.

त्यात काँग्रेस सुप्रीम कोर्टात धाव घेऊन भाजपच्या विरोधात याचिका दाखल केली. त्या विरोधात न्यायालयाने आज दुपारी चार वाजेपर्यंत विधानभवनात बहुमत चाचणी घेण्याचे भाजपला आदेश दिले. मात्र त्यात भाजप आणि मुख्यमंत्री येडियुरप्पा अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस भवनाच्या आवारात शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लाडू आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.