News Flash

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या चिमणीवर बसून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

वीज केंद्राचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्राच्या चिमणीवर बसून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन.

नोकरीत सामावून घ्या या मागणीसाठी मागील १० ते १२ वर्षांपासून आंदोलन करीत असलेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी ६ जणांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्रमांक ७ च्या चिमणीवर चढून आंदोलन सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यामुळे वीज केंद्राच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. वीज केंद्राची उभारणी करताना १९७० मध्ये या भागातील हजारो लोकांच्या शेतजमीन घेण्यात आल्या होत्या. त्यातील काहींना प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीत सामावून घेतले गेले. मात्र, आजही शेकडो प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना कंत्राटदाराकडे ८ ते १० हजार रुपये पगारावर नोकरी करावी लागत आहे. वीज केंद्रात कायम नोकरीत घ्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत आहे.

दरम्यान, आज सकाळी तीन मुले आणि तीन मुलींनी वीज केंद्राच्या ५०० मेगावॅट क्षमतेच्या चिमनीवर बसून आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच वीज केंद्राचे सर्व अधिकारी व पोलीस घटनास्थळी पोहचले असून आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 2:32 pm

Web Title: agitations of project victims sitting on the chimney of chandrapur coal power station aau 85
Next Stories
1 #DhanyawadBalasaheb हॅशटॅग होतोय ट्रेण्ड; अमेरिकेतील सेलिब्रेशनच्या पोस्टरवरही झळकले बाळासाहेब
2 रायगड : जिल्ह्यात पावसाचा जोर अद्यापही कायम; महाडमध्ये पूरस्थिती
3 राम मंदिर भूमिपूजन : संजय राऊतांना झाली बाळासाहेबांची आठवण, पोस्ट केला खास फोटो
Just Now!
X