कोपर्डी प्रकरणातील दोषींवर जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना न्यायालयाने बुधवारी पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. राजेंद्र जऱ्हाड (वय २१ वर्ष), बाबुराव वालेकर (वय ३०), अमोल खुणे (वय २५) आणि गणेश खुणे (वय २७) या चौघांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मराठवाड्यातील शिवबा ग्रुपच्या चार जणांना अटक करण्यात आली होती. हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, शस्त्र प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी राजेंद्र  आणि त्याच्या साथीदारांना मंगळवारी दोषी ठरवले होते. या खटल्यात सरकारतर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. हल्लेखोरांचा कोपर्डीतील आरोपींना मारण्याचाच उद्देश होता, अन्यथा जालवा व बीड येथील रहिवासी असलेल्यांचा नगरच्या जिल्हा न्यायालयात येण्याचा काहीच उद्देश नव्हता. कोपर्डीतील आरोपींना मारण्याचेच कटकारस्थान रचल्याने चौघे जण न्यायालयाच्या आवारात आले. नगरच्या कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कोपर्डी बलात्कारप्रकरणातील  जीव वाचला. न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही चौघांचे चित्रीकरण आढळले आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरताना न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले. या चौघांच्या शिक्षेवर बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला.

नेमकी घटना काय?

कोपर्डीतील बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिघांना १ एप्रिल २०१७ रोजी न्यायालयात सुनावणीसाठी नेले जात होते. या दरम्यान न्यायालयाच्या आवारात दबा धरुन बसलेल्या राजेंद्र, बाबुराव, अमोल आणि गणेशने सत्तूरच्या सहाय्याने त्या तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस हवालदार रवींद्र टकले हे देखील जखमी झाले होते.