29 September 2020

News Flash

शिवसेनेला मत दिल्याने श्रीपाद छिंदमना शिवसैनिकांकडून मारहाण

अहमदनगरमधील महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवड सभा पार पडली.

श्रीपाद छिंदम

अहमदगनर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना शिवसेना नगरसेवकांनी मारहाण केली. छिंदम यांनी शिवसेनेला मतदान केल्याने शिवसेना नगरसेवक चिडले आणि यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अहमदनगरमधील महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवड सभा पार पडली. महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांच्यात तिहेरी लढत होणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपाचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिल्याने सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला निवडणुकीत बाजी मारता आली नाही.

महापौर पदाच्या निवडणुकीत कोण अनुपस्थित राहणार, कोण तटस्थ राहणार यालाही महत्त्व होते. त्यापार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मतदान सुरु होताच शिवसेनेने त्यावर बहिष्कार टाकला. निवडणुकीदरम्यान छिंदम यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. यामुळे चि़डलेल्या शिवसेना नगरसेवकांनी छिंदम यांचे मत ग्राह्य धरु नये, अशी मागणी केली. संतापलेल्या सेना नगरसेवकांनी थेट छिंदम यांना मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

अहमदनगरमधील नगरसेवकांची संख्या ६८ आहे. मात्र वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांची साथ घेण्यास कोणताच पक्ष तयार नव्हता, त्यामुळे तो वगळूनच गणिते जुळवली जात होती. छिंदम यांनी भाजपाच्या सांगण्यावरुन शिवसेनेला पाठिंबा दिला, असा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला आहे. छिंदम यांना मारहाण  केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अहमदनगरमधील संख्याबळ
एकूण संख्याबळ – ६८
शिवसेना – २४
राष्ट्रवादी काँग्रेस – १८
भाजपा – १४
काँग्रेस – ५
बसपा – ४
अपक्ष – २
समाजवादी पक्ष – १

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 12:07 pm

Web Title: ahmednagar mayor election 2018 shripad chindam beaten by shiv sena corporator
Next Stories
1 प्रगतीचा झाला तेवढा उत्कर्ष पुरे – नाराज प्रवांशांची प्रतिक्रिया
2 दापोली- खेड मार्गावर भीषण अपघात, पाच ठार
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X