News Flash

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम अहमदनगरमधून तडीपार

खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोडसह १४ जणांना अटी व शर्तीवर शहरातील वास्तव्यास परवानगी

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम अहमदनगरमधून तडीपार
श्रीपाद छिंदम, संग्रहित छायाचित्र

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा व महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम याला निवडणूक काळात शहरातून हद्दपार करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी बुधवारी दिला. छिंदम याच्यासह आणखी पाच जणांवर अशाच स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुक काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कोतवाली, तोफखाना व भिंगार कँप पोलिसांनी आजी, माजी आमदार, विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नगरसेवकांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. टप्प्या टप्प्याने त्याची सुनावणी होऊन आदेश पारित केले जात आहेत.

छिंदम याच्यासह ओंकार कराळे, भाऊसाहेब कराळे, मनोज कराळे, दिपक खैरे या पाच जणांना निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५ दिवसांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या पाच वर्षांपूर्वीच्या निवडणूक काळातही छिंदम याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.

भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड, राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे, संजीव भोर आदी १४ जणांना अटी व शर्तीवर शहरातील वास्तव्यास परवानगी देण्यात आली आहे. ५० हजार रुपयांचा जातमुचलका, चांगल्या वर्तणुकीची हमी व पोलिस ठाण्यात रोज हजेरी अशी बंधने त्यांच्यावर टाकण्यात आली आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 10:22 am

Web Title: ahmednagar police fugitive action on shripad chindam tadipaar till 10 th december
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
2 ‘जलयुक्त’ नव्हे, ‘झोलयुक्त’ शिवार
3 अधिष्ठात्यांना औषध खरेदीचे जादा अधिकार
Just Now!
X