News Flash

मृत घोषित केलेले बाळ जिवंत होते तेव्हा..

रुग्णालयातील गलथानपणा चव्हाटय़ावर आला आहे.

सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात जन्मलेले बाळ  दुसऱ्याच दिवशी फुफ्फुसात पाणी गेल्याने प्रकृती गंभीर होऊन मरण पावल्याचे तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी घोषित केले. जनन वार्ताबरोबर मृत्युवार्ताचे पत्र बाळाच्या नातलगांच्या हाती सोपविण्यात आले. मृत जाहीर झालेल्या बाळाला स्मशानभूमीत नेले व दफनविधीची तयारी सुरू असतानाच अचानकपणे मृत बाळ जिवंत झाले. यानिमित्ताने शासकीय रुग्णालयातील गलथानपणा चव्हाटय़ावर आला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथे राहणाऱ्या ज्योती शिवप्पा वाघमारे (वय २०) या गरोदर विवाहितेने प्रसूतीसाठी छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल होऊन एका बाळाला जन्म दिला होता. परंतु नवजात बाळाची प्रकृती लगेचच ढासळली. शरीरात फुफ्फुसामध्ये पाणी शिरल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. नंतर काही वेळातच बाळाचा मृत्यू झाल्याचेही डॉक्टरांनी जाहीर केले. तसे मृत्युवार्तेचे पत्रही भरून देण्यात आले. इकडे बाळ मरण पावल्याचे समजल्यानंतर दु:खी अंत:करणाने नातेवाईकांनी बाळाचा ताबा घेतला व दफन करण्यासाठी बाळाचा मृतदेह सिंदखेड येथे गावी नेला. स्मशानभूमीत मृतदेह नेऊन दफनविधी पूर्ण करणार, इतक्यात मृत बाळ चिरकले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून सारेचजण स्तंभित झाले. मृत घोषित केलेले बाळ जिवंत झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोंधळ उडाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 1:04 am

Web Title: alive baby declared dead
Next Stories
1 अंतिम फेरीत १० स्पर्धकांचा प्रवेश
2 मनमाडमध्ये चोरीच्या पाच दुचाकी जप्त
3 सूरजागडवरील लोह उत्खननासाठी ५ सशस्त्र पोलिस दूरक्षेत्रांना मंजुरी
Just Now!
X