रवींद्र केसकर, उस्मानाबाद 

उस्मानाबादच्या राजकारणात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा दबदबा असला तरी गेल्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना पराभवाची धूळ चारली होती. गेल्या पाच वर्षांत राजकारण बदलले आहे. शिवसेनेत वाढलेली गटबाजी, तब्येतीच्या कारणाने डॉ. पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात नसणे यातून संदर्भही बदलले आहेत. हा मतदारसंघ पुन्हा कायम राखण्यासाठी शिवसेनेने चंग बांधला असतानाच राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीचा घोळ सुरू आहे.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
MP Omraje Nimbalkar On Malhar Patil
“तुमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयामध्ये भाजपा आहे, आता किडनीमध्ये…”; ओमराजे निंबाळकर यांचा मल्हार पाटलांना टोला
Ajit Pawar, sunetra pawar
दुभंगलेली मने जोडण्यावर अजित पवारांचा भर
Devendra Fadnavis
बारामती, शिरूरमधील नाराजांच्या मनधरणीसाठी फडणवीसांची धावाधाव

२००९मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांनी रवींद्र गायकवाड यांना धूळ चारत दिल्ली गाठली. त्याचा वचपा २०१४ साली झालेल्या निवडणुकीत प्रा. रवींद्र गायकवाड यांनी काढला. राज्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांचा तब्बल दोन लाख ३४ हजार मतांनी पराभव झाला. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्य़ाच्या राजकारणात अनेक नाटय़मय घटना घडल्या. शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा आमदार तानाजी सावंत यांच्याकडे गेली. त्यामुळे सेनेत निष्ठावंत विरुद्ध आयात केलेले सैनिक अशी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा विजयासाठी शिवसेनेला घाम गाळावा लागणार आहे.

खासदार प्रा. रवींद्र गायकवाड सेनेचे तसे जुने नेते आहेत. खासदार झाल्यापासून त्यांनी १४ कोटी रुपयांहून अधिक निधी मतदारसंघातील विकासकामांवर खर्च केल्यांचा त्यांचा दावा आहे. जिल्ह्य़ातील अनेक विकासकामांवर भाजप आपला दावा ठोकत आहे. तीच कामे पूर्ण करण्यासाठी आपण भरीव निधी दिला असल्याचे खासदार गायकवाड सांगतात. त्यामुळे नेमके खरे काय, याचा संभ्रम मतदारांमध्ये आहे. अनेक वर्षांपासून लटकलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचा पाठपुरावा केल्यामुळेच त्याला गती मिळाल्याचे खासदार सांगतात तर भाजपवाले पंतप्रधान नरेंद्र मोदींना याचे श्रेय देतात. मराठवाडय़ाच्या पाण्याचा रखडलेला कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा प्रश्न आपण लावून धरला असल्याचे खासदारांचे मत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस याबाबतीत सेनेने मागील चार वर्षांत काय केले, असा थेट सवाल उपस्थित करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमका लोकसभेचा चेहरा कोण, हे अद्याप स्पष्ट नसले तरी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबीयांचे मत ध्यानात न घेता उमेदवार अंतिम होण्याची शक्यता तशी धूसरच आहे. डॉ. पाटील यांची सून अर्चना पाटील यांच्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा आहे. त्याचबरोबर आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सुद्धा ऐनवेळी उमेदवार असू शकतात. स्वत: आमदार पाटील यांनीदेखील दुजोरा दिला आहे. कौडगाव येथील रखडलेल्या एमआयडीसीच्या प्रश्नाकडे मागील चार वर्षांत खासदारांनी साफ दुर्लक्ष केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. केवळ निविदा उघडल्या नसल्यामुळे जिल्हय़ासाठी महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प रखडला असून शिवसेनेला त्याचे सोयरसुतक नसल्याचा आरोप ते करतात.

२००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना या पारंपरिक प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांचा पराभव केला आहे. यंदा दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जरी आघाडी झाली असली तरी उस्मानबादचे काँग्रेसचे नेते हे आघाडीचा धर्म जपतील का, अशी शंका राष्ट्रवादीच्या नेत्यांना असते. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक कसोटी असणार आहे.

वादग्रस्त खासदार

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या अनेक तक्रारी असतात. पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीवरून ते वादात सापडले होते. मारहाणीच्या घटनेमुळे खासदारांची राष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली होती. त्यांच्यावर विमान प्रवासाची बंदी घालण्यात आली होती.

उस्मानाबाद जिल्ह्य़ासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी सभागृहात सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाणी आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळेच निधीची तरतूद करण्यात आली. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वेमार्गाला गती मिळाली आहे. अंतिम सर्वेक्षणाकरिता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. आपण व्यक्तिश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यासाठी सतत आग्रह धरला होता. सभागृहातदेखील त्याकरिता आक्रमक भूमिका मांडली होती. त्यामुळे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील चार वर्षांत १८ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहे. जिल्ह्य़ात आणि मतदारसंघातून नवीन राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्यातदेखील यश आले आहे.

– रवींद्र गायकवाड, खासदार

उस्मानाबाद जिल्ह्य़ाचा केंद्र सरकारने निती आयोगाच्या निकषांनुसार मागास जिल्ह्य़ाच्या यादीत समाविष्ट केला आहे. अशा वेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हय़ासाठी विशेष प्रकल्प अथवा भरघोस निधी मंजूर करवून घेणे सहज शक्य होते. मात्र खासदारांना हे जमले नाही. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास राष्ट्रीय दर्जा देऊन विशेष निधी उपलब्ध करवून घ्यायला हवा होता. दुर्दैवाने त्यातही खासदार अपयशी ठरले आहेत. पालकमंत्री आणि खासदार दोन्ही महत्त्वाची पदे सध्या सेनेकडे आहेत. मात्र, जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर एकही ठळक काम त्यांनी केलेले नाही. मागील साडेचार वर्षांत जिल्हय़ात अथवा मतदारसंघात सांगता येईल, असा एकही मोठा प्रकल्प त्यांना मंजूर करवून घेता आलेला नाही. ९०४ कोटी रुपये प्रकल्प किंमत असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वेमार्गाला केवळ एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खासदारांनी त्यासाठी प्रयत्नपूर्वक मोठी तरतूद मंजूर करवून घेणे जमलेले नाही.

-राणाजगतसिंह पाटील, आमदार