अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव अनिकेत ओव्हाळ यांचा नंदुरबार येथे नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवार) घडली.

याबाबत अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मिलींद मराठे यांनी माहिती देताना सांगितले की, अनिकेत ओव्हाळ हे अन्य काही जणांसह नंदुरबार येथील धाडगाव येथील नदीत पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पोहताना ते एका भोवऱ्यात अडकले व त्यातून त्यांना बाहेर पडता आले नाही.

ओव्हाळ यांची दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सचिव पदावरून राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अभाविपच्या आंदोलनात ते सक्रीय होते.