सावंतवाडी येथे १७ व १८ जानेवारीला होणाऱ्या सहाव्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, हैदराबाद येथील ख्यातनाम लेखक, कवी, विचारवंत आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मिळून ४०० ते ५०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनानिमित्त सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यात शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग राहणार आहे. बॅ. नाथ पै सभागृहातील संमेलननगरीला बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे तर विचारमंचाला कै. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव देण्यात आले आहे. १७ जानेवारी २०१५ सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी व ग्रंथस्टॉलचे उद्घाटन हरिहर आठलेकर (कविवर्य डॉ. वसंत सावंत ग्रंथदालन) यांच्या हस्ते, सकाळी ९.३० ते ११ वाजता उद्घाटन समारंभ होणार असून, संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर (मुंबई) तर उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) हे आहेत. स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष बबन साळगावकर आहेत. त्याआधी शाहीर सदाशिव निकम आणि शीतल साठे व सहकारी चळवळीची गाणी सादर करणार आहेत.
या संमेलनाला प्रख्यात लेखक डॉ. राजन गवस (कोल्हापूर), पुणे येथील डॉ. रावसाहेब कसबे, ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख आणि संपादक सल्लागार किरण ठाकूर (बेळगाव), जयानंद मठकर (सावंतवाडी), गोविंद पानसरे (कोल्हापूर), प्रा. आनंद मेणसे (बेळगाव) यांची प्रमुख उपस्थिती आहे.
पहिल्या दिवशी परिसंवाद, काव्यसंमेलन
सकाळी ११ ते २ या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची प्रस्तुतता व समकालीन साहित्याच्या दिशा’ यावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. माया पंडित (हैदराबाद) आहेत. यात रणधीर शिंदे, नितीन रिंढे, आसाराम लोमटे (जळगाव), डॉ. सुनील भिसे (वेंगुर्ले), प्रा. उदय रोटे (उल्हासनगर) सहभागी होणार आहेत. दुपारी ३ ते ५ या वेळेत परिसंवाद दुसरा- सांस्कृतिक आक्रमकांची सद्दी वाढत चालली आहे काय?- अध्यक्ष राजा शिरगुप्पे, निमंत्रित- सचिन परब (गोवा), मुक्ता दाभोलकर (दापोली), श्रीकांत देशमुख (नांदेड), गणेश विसपुते (पुणे), डॉ. शिवाजीराव जवळगेकर (लातूर) यांचा  समावेश आहे.
सायं. ५.३० ते ६.३० शाहिरी जलसा (सादरकर्ते शाहीर सदाशिव निकम, कोल्हापूर आणि शाहीर शीतल साठे, मुंबई.) ६.३० ते ८.३० या वेळेत निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून, अध्यक्षस्थान मुंबई येथील प्रफुल्ल शिलेदार भूषविणार आहेत. यात कवी आनंद विंगकर, निळकंठ कदम, दिलीप पांढरपट्टे, आ. सो. शेवरे, वर्जेश सोळंकी, अनिल कांबळी, गणेश वसईकर, फिलिक्स डिसोजा, रफिक सूरज, अजय कांडर, नामदेव गवळी, शोभा नाईक, अनुजा जोशी, बालाजी सुतार, संध्या तांबे, लीलाधर घाडी, उत्तम पवार, अरुण नाईक, सफर अली इसफ, मोहन कुंभार, अनिल फराकटे, विठ्ठल कदम, महेश लीला पंडित, मधुकर मातोंडकर, जयप्रभू कांबळे, डॉ. शरयू आसोलकर, अनिल सरमळकर, कल्पना बांदेकर, हर्षवर्धिनी जाधव, कल्पना मलये, योजना यादव, दशरथ शिंदे यांचा सहभाग आहे.
१८ जानेवारीला सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘राजकारण व समाजकारणाच्या कक्षा संकुचित होत चालल्या आहेत काय?’ यावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्ष डॉ. अशोक चौसाळकर (कोल्हापूर), सहभागी वक्ते रमाकांत खलप (गोवा), प्राचार्य आनंद मेणसे (बेळगाव), किशोर बेडकीहाळ (सातारा), कपिल पाटील (मुंबई), रमेश गावस (गोवा), वैशाली पाटील (रायगड). समारोप १२.३० ते १.३० वाजता होणार असून, प्रमुख अतिथी- वित्त आणि ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, सतीश काळसेकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. राजन गवस, जयप्रकाश सावंत उपस्थित राहणार आहेत.
नगरपालिका लोकमान्य सभागृहात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी ही माहिती दिली. या वेळी अ‍ॅड्. संदीप निंबाळकर, प्रवीण बांदेकर, उपनगराध्यक्ष राजन पोकणे, गोविंद काजरेकर, शर्वरी धारगळकर, वैशाली पटेल, प्रा. सुमेधा नाईक आदी उपस्थित होते.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा