शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेवर जिल्हाधिकारी व महानगरपालिका ठाम आहे. अशोका हॉटेल ते नगर महाविद्यालय अशी राज्यमार्गावरील अतिक्रमणे गुरुवारी काढण्यात आली.
मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस यांनी संयुक्तपणे परवा (मंगळवार) शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली होती. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या आदेशानुसारच ही मोहीम सुरू करण्यात आली. मात्र पहिल्याच दिवशी आमदार अनिल राठोड यांनी त्याला विरोध केल्याने त्याच दिवशी अध्र्यावरच ही मोहीम गुंडाळण्यात आली होती. नेप्ती चौक (कल्याण रस्ता) ते दिल्लीगेट या परिसरातील अतिक्रमणे मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हटवली. मात्र सिद्धी बागेजवळ राठोड यांनी या कारवाईला आक्षेप घेत त्याला विरोध केल्याने त्या दिवशीच येथेच ही कारवाई थांबवण्यात आली.
या प्रकारामुळे या मोहिमेबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र मनपाच्या पथकाने बुधवारच्या सुटीनंतर गुरुवारी पुन्हा ही मोहीम सुरू केली आहे. आज राज्यमार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली.