माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या चौकशीची मागणी

लोकसत्ता वार्ताहर

पालघर: विक्रमगड आलोंडे येथील एका शिक्षण संस्थेत एकाच व्यक्तीला एकाच दिवशी मुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदाचा पदभार देऊन कामात अनियमितता केल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर त्रयस्थ संस्थेमार्फत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणातील चौकशी करण्यास सांगितले होते.  समितीने विविध त्रुटी व अनियमितता केल्याचा  अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला. होता.शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात माध्यमिक विभागात राबविलेल्या सर्व निविदा प्रक्रियांची चौकशी करून दोषी आढल्यास कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

शासकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करून स्वत: शासकीय अधिकारी असलेल्या शिक्षणाधिकारीच कामात अनियमितता करीत असल्याबद्दल खेद आहे. त्यासाठी चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे

-निलेश सांबरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती, जि. प.पालघर