News Flash

समाजात तेढ निर्माण करणारा मेसेज सोशल मीडियावर पसरवणाऱ्यास अटक

न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

संग्रहीत

-दत्तात्रय भरोदे

भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा धार्मिक भावना भडकवणारा मेसेज सोशल मीडियावर व्हॉट्सएप ग्रुपद्वारे पसरवणाऱ्या एकाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे शहापुरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तर, प्रकरण चिघळू नये यासाठी शहापुरात दंगल नियंत्रण पथक पाचारण करण्यात आले होते.

शहापूर पोलीस ठाण्यात काल(शुक्रवार) रात्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले. याप्रकरणी आक्षेपार्ह मेसेज पसरविल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इसमाला शहापूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक तपास शहापूर पोलीस करीत असून सोशल मीडियाद्वारे विविध प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज पसरवणाऱ्या ग्रुपवर लक्ष ठेऊन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 5:13 pm

Web Title: arrested for spreading hurtful message on social media msr 87
Next Stories
1 नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू : गोपनीय बातमीदारांच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी नोकरी
2 तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज राहू – उद्धव ठाकरे
3 पुरावा द्या नाहीतर माफी मागा; नवाब मलिकांवर भाजपाचा पलटवार
Just Now!
X