सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे घेण्यात आलेल्या जेईई मुख्य परीक्षेत यंदा औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. शहरातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी या झळाळत्या यशाला गवसणी घातली.
औरंगाबादच्या सुशील वर्मा या विद्यार्थ्यांने ३१५ गुणांसह चमकदार यश मिळविले. देशभरातून १३ लाख ५६ हजार ८०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातील दीड लाख विद्यार्थी परीक्षेतून प्रवेशास पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना एनआयटी, आयआयटीसह राज्य व केंद्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळणार आहे. दरम्यान, या ३०० यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ७२ विद्यार्थी गुरूकुल क्लासेसचे आहेत. या क्लासेसने यंदा ७५ टक्के यश साध्य करून नवा विक्रम नोंदविला. ‘गुरूकुल’चे निर्मल बिस्वास, प्रदीप गिरी यांनी विद्यार्थ्यांचे हे यश औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे असल्याचे सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातून ८ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी, तर ३५० विद्यार्थ्यांनी ही ऑनलाईन परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या निकालावरच देशातील नामवंत अभियांत्रिकी संस्थेचे (आयआयटी) प्रवेश निश्चित होतात.