News Flash

बीड : अंबाजोगाईत तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन ठार, सहा गंभीर जखमी

अपघातातील मृत दोघंही एकाच घरातील असल्याने परिसरात शोककळा

( सांकेतिक छायाचित्र)

बीडमधील अंबाजोगाई येथे तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.  अंबाजोगाई-लातूर रोडवर शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र या अपघातातील मृत दोघंही एकाच घरातील असल्याची प्राथमिक माहीत आहे. परिणामी, परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास  अंबाजोगाई-लातूर रोडवर नंदगोपाल दूध डेअरीजवळ दोन कार आणि एका रिक्षात हा विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन जण जागीच ठार झाले, तर अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 11:46 am

Web Title: beed ambajogai road accident sas 89
Next Stories
1 साकळाई पाणी योजनेसाठी दीपाली सय्यद यांचे आमरण उपोषण
2 महापुराचा एसटीला १०० कोटींचा फटका
3 राज्य भारत स्काऊट बरखास्त
Just Now!
X