03 March 2021

News Flash

रेडिओस्फोट घातपात प्रकरणी एकाला अटक

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या काळेगावघाट येथे शुक्रवारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहकाच्या घरात रेडिओ बॉम्बचा स्फोट झाला. याप्रकरणी आबा उर्फ मुंजबा गिरी या व्यक्तीला

| December 3, 2012 11:23 am

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या काळेगावघाट येथे शुक्रवारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहकाच्या घरात रेडिओ बॉम्बचा स्फोट झाला. याप्रकरणी आबा उर्फ मुंजबा गिरी या व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. तसेच, या स्फोटामागे अतिरेकी हात नसल्याचं स्पष्टीकरणही मुंबई पोलिसांनी दिलं आहे.  अंबाजोगाई-मुंबई गाडीत एक पार्सल बेवारस राहिल्यानंतर वाहक ओम निंबाळकर यांनी ते आपल्या घरी नेले व त्यातील रेडिओमध्ये सेल टाकून तो सुरू करताच स्फोट झाला. यात ओम निंबाळकर, त्यांची पत्नी उषा, आई कुसुम व मुलगा कुणाल (वय २) गंभीर जखमी झाले.  प्राथमिक उपचारानंतर शनिवारी पुढील उपचारासाठी जखमींना मुंबईस हलविण्यात आले.
शुक्रवारी दाखल झालेले एटीएसचे पथक आणि दिल्लीहून आलेली एनआयएची तुकडी घटनास्थळी तपास करत आहे. स्फोटामागे दहशतवादी हात आहे का याचीही चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिस आणि एटीएसनंही या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या स्फोटामागील कारणांचा फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच खुलासा होणार आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 11:23 am

Web Title: beed radio blast police arrest 1
टॅग : Beed
Next Stories
1 उद्धव ठाकरे व राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर
2 शुभेच्छा फलकांसाठी मोक्याच्या जागा शोधण्यात वैदर्भीय लोकप्रतिनिधी व्यस्त
3 भूसंपादन, पुनर्वसनामुळे प्रकल्पखर्चात २० टक्क्यांची वाढ
Just Now!
X