26 April 2018

News Flash

भीमा कोरेगावात भाजप आणि संघानेच दंगल घडवली; केजरीवालांचा घाणाघात

सिंदखेडराजात भाजपवर केली सडकून टीका

सिंदखेडराजा येथे बोलताना अरविंद केजरीवाल.

सिंदखेडराजा : दोन समाजांत भांडणे लावून राजकारण करण्याची भाजपमध्ये पद्धत आहे. भाजपाचा इतिहास दंगलीचा आहे. भीमा कोरेगाव येथे देखील भाजपा आणि आरएसएसने दंगल घडवून आणली, असा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. सिंदखेडराजा येथे आपच्या ‘महाराष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले.

भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसवर जोरदार टीका करताना केजरीवाल म्हणाले, फोडा आणि राज्य करा अशी नीती वापरत इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली. भारतातील शांतता भंग करण्याचे पाकिस्ताने ७० वर्षापासूनचे स्वप्न भाजपाने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले आहे.

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हा आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच अशी घोषणा यावेळी ‘आप’कडून करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा दिल्ली सरकारने उचलला आहे. ४० हजार कोटींचे बजेट असताना आप सरकार सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देत आहे. महाराष्ट्रात मात्र 3 लाख कोटींचे बजेट असताना सरकारी शाळा विक्रीला काढल्या असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

शिवाजी महाराजांचे नाव घेत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. भाजपा सरकारला शेतकऱ्यांची चिंता नसल्याचे सांगत. दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची माहिती केजरीवालांनी यावेळी दिली. दिल्लीत सत्तेत येऊन तीन महिने झाले होते. पावसाने संपूर्ण पीक मातीमोल झालेले असताना दिल्ली सरकारने परिस्थितीची पाहणी करून अवघ्या तीन महिन्यांत हेक्टरी ५० हजारांची मदत केली. स्वतंत्र भारतात ही सर्वांत जास्त मदत असल्याचे केजरीवाल म्हणाले. देशभरात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची गरज असल्याचे सांगत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्ली सरकारने आरोग्य, वीज या क्षेत्रात केलेले काम सांगत महाराष्ट्रात देखील आम आदमीच सरकार आलं पाहिजे असे केजरीवाल म्हणाले. सत्तेत आल्यावर दिल्लीत देशभरात सर्वात महाग वीज होती. वीज कंपनीच ऑडिट करून आता देशात सर्वात स्वस्त वीज दिल्ली सरकार देत आहे. महाराष्ट्रात ही ते होऊ शकतं. मात्र, वीज कंपन्या आणि सरकारचे साटलोटे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीजबिलाचा शॉक दिला जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेणेही आवाक्या बाहेर जाते. त्यामुळे दिल्ली सरकारने मोफत उपचार पुरवले. हा सगळा प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो. त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणी काँग्रेसला सत्तेबाहेर काढायला हवे असे केजरीवाल उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

First Published on January 12, 2018 2:53 pm

Web Title: bjp and sangh formed a riot in bhima koregaon kejariwala lump
 1. Himalaya L Raut
  Jan 14, 2018 at 1:44 pm
  ६० वर्षा मध्ये कधी भाजपाने दंगली घडविल्या नाही, स्वताच सरकार असताना दंगली कशाला घडवील, हे भाजपा विरोधात कुट कारस्थान रचताहेत विरोधक.
  Reply
  1. A
   Arun
   Jan 13, 2018 at 9:27 pm
   भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी एटीएसकडून नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या सात जणांना अटक झाली आहे. आणि हा दीडशहाणा भाजपाच्या नावाने कोकलत आहे. आता तरी दिल्लीत जाऊन तोंड लपवा. अब्रुनुकसानीचा दाव्यात शेपूट घालून मांडवली केली आणि आता भाजपाला टाकल्याचा देखावा जनतेला दाखवतोय.
   Reply
   1. Shivram Vaidya
    Jan 12, 2018 at 8:32 pm
    राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, खांग्रेसी आणि सर्व कम्युनिस्ट नेते, दलितांचे स्वयंघोषित नेते, पुरस्कारवापसी टोळीचे ढोंगी, तुकडे-तुकडे गँग, ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी स्वतःच्या मनगटाला चुना लावून नरेंद्र मोदी आणि भाजपचे जनतेच्या मनामधील स्थान नष्ट करण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत ! त्यासाठी त्यांनी एवढी वर्षे हिंदू-मुस्लिमांमध्ये काड़्या घातल्या. २०१४ च्या निवडणुकी नंतरच्या निवडणुकांमध्ये हिंदू-मुस्लिम जनतेने खांग्रेसला धोबीपछाडा घातल्यानंतर खांग्रेस आता मुस्लिमांना सोडून हिंदू धर्मामध्येच जातीय विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला प्रकाश आंबेडकरही साथ देत आहेत. हे सर्व एका कट-कारस्थानाचा भाग आहे. देशातील सर्वधर्मीय, सर्व जातीपातीच्या, सर्व प्रांतांच्या-भाषांच्या जनतेहे खांग्रेसच्या या देशद्रोही आणि समाजघातक कटापासून अत्यंत सावध राहावे. खांग्रेस सत्तेसाठी काहीही करायला मागेपूढे बघत नाही आणि त्यांचे शय्यासोबतीही !
    Reply
    1. vikram joshi
     Jan 12, 2018 at 8:06 pm
     बर. जर हे इंद्रप्रस्थ वासी महाशय एवढ्या तावातावाने आणि ठामपणे बोलत आहेत की कोरेगाव भीमा च्या हिंसाचारामागे भाजप व RSS आहे तर मग या अर्थाने यांच्याकडे खुप पक्की माहिती असावी. महाराष्ट्र पोलीसांनी यांना ताब्यात घ्यावे व यांच्याकडून ही माहिती काढावी. कारण गुन्ह्याबद्दल माहिती देणे हे एका जबाबदार नागरीकाचे कर्तव्य आहे. जर हे माहीती लपवत असतील तर निर्ढावलेल्या गुन्हेगारांकडून जशी माहिती काढली जाते तसाच प्रकार या महाशयांसोबत करावा.
     Reply
     1. Shivram Vaidya
      Jan 12, 2018 at 6:59 pm
      अरविंद केजरीवालांच्या या बेलगाम आरोपानंतर त्यांच्यावर भाजप आणि संघाने खटला दाखल करावा आणि केजरीवाल ने हा आरोप सिद्ध करण्यात कसूर केली तर त्याला कायद्याचा हिसका दाखवला जावा !
      Reply
      1. A
       Amit
       Jan 12, 2018 at 6:43 pm
       कोरेगाव भीमा
       Reply
       1. v
        vijay_shingote
        Jan 12, 2018 at 6:00 pm
        Kejriwal has done very good thing for health and education in Delhi. His point is correct it is possible here also.
        Reply
        1. A
         anupkumar
         Jan 12, 2018 at 5:23 pm
         का उगीच बोंबोलतो आहे हा ! आपले स्वतःचे राज्य का नीटपणे सांभाळत नाही. का महाराष्ट्रात येऊन लोकांना भडकवण्याचे का करीत आहे. याला महाराष्ट्र शांत झाला आहे हे बघवत नाही का? तुझा पक्ष इथे कधीच वाढणार नाही तरी आता तुझे भुंकणे बंद कर बाबा.
         Reply
         1. D
          DS
          Jan 12, 2018 at 5:15 pm
          केजरीवालांचे मुद्दे खरे आहेत कि खोटे हे तपासणे कठीण नाही. खासकरून शाळा व विजेचा मुद्दा!
          Reply
          1. A
           Arvind
           Jan 12, 2018 at 5:12 pm
           याला हेच जमत फक्त, सो चुहे खके हज को चाली.
           Reply
           1. राज
            Jan 12, 2018 at 5:11 pm
            काही उपयोग नाही होणार दादा केज्रूच्या सभेचा ...सगळे चॅनल सर्वौच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांबद्दल बोलत आहेत, केज्रूकडे कोणाचेच लक्ष नाही....तिळपापड झाला असेल केज्रूचा
            Reply
            1. P
             prakash
             Jan 12, 2018 at 5:10 pm
             हे पर प्रांतीय येऊन आता मराठी दलित लोकांचा फायदा घेऊन मराठी लोकांची भांडणे लावणार .नाव देणार RSS बीजेपीला .माझ्या मराठी दलित गैर दलित बांधवानो या ला स्वतःची पार्टीत कोण विचारात नाही आणि आला आहे मराठी लोकांना भडकावयाला .कृपया अश्या माथेफिरू भडक नेत्यांना चपलांचे हार घालून त्यांची जागा दाखवावी .याला ना मराठी लोकांना आव आणून दाखवावयाचे आहे कि कोणी माझ्य झाल्यात फसतो आहे का .यांची भिक्कार भाषणे तुडवून टाका
             Reply
             1. C
              chandrashekharb
              Jan 12, 2018 at 4:42 pm
              लोकसत्ता सारख्या जबाबदार वृत्तपत्राने बातमी छापताना अशा गंभीर चुका करणे अपेक्षित नाही. बातमीत छापलेले भीमा कोरेगाव हे नाव चुकीचे आहे. कोरेगाव भीमा हे खरे नाव आहे. कृपया चूक दुरुस्त करा.
              Reply
              1. S
               sjj
               Jan 12, 2018 at 4:31 pm
               केजरीवालला सिंदखेडराजा अगोदर माहित होत का ? आता पुढल्या वर्षीच्या निवडणुकांमुळे सगळ्यांना सिंदखेडराजा,भीमा कोरेगाव ह्या गोष्टी आठवायला लागल्या..खरे म्हणजे महाराष्ट्रातल्या शांततेचा भंग हेच बाहेरचे लोक येऊन करताहेत..बाहेरून येऊन हे आम्हाला शिकवणार..वा वा ...दिल्लीतले व इतर राज्यातले गुंड, पुंड, तडीपार लोकांनी महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत व सभ्य लोकांना शांतता वगैरे शिकवण्याची गरज नाही
               Reply
               1. R
                raj
                Jan 12, 2018 at 3:43 pm
                आम्ही काही दिल्लीकर सारखे डोक्यावर पडलो नाही तुम्हाला निवडून द्यायला. आमचे सरकार चांगले काम करीत आहे. तुम्ही सौदी ला जाऊन पैसे घेऊन या निवडणूक लढायला.
                Reply
                1. A
                 Abhijit Deshpande
                 Jan 12, 2018 at 3:38 pm
                 केजरीवालांचा घाणाघात?? घाणाघात?? खरंच? हो लोकसत्तावाले - या केजरीची बायको सुद्धा विश्वास नाही ठेवणार या हेडलाईन वर.
                 Reply
                 1. A
                  Anish
                  Jan 12, 2018 at 3:23 pm
                  किती जण होते याच्या सभेला ? आणि जर आर एस एस ने मानहानीचा दावा ठोकला तर नाक घासत माफि मागेल हा कुत्रा.. आखि पुरावे आहेत का यांच्याकडे हे बोलण्यासाठी ?? उचली जीभ आणि लावली टाळ्याला अशा प्रकार आहे
                  Reply
                  1. N
                   Nitin Devlekar
                   Jan 12, 2018 at 3:09 pm
                   सेक्युलर-सैतान चोरांच्या उलट्या बोंबा !! भाजप सत्तेत आहे ते कशाला हे करतील?? कोणते जाणते नेते हे करू शकतात ते महाराष्ट्रात सारे जाणतात. एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारू नये!! आमच्या दलित चळवळीची नेहमीची ठरलेली शोकांतिका सुरु आहे.. पहिला सभेचा आणि दुसरा दंगलीचा अंक तर लई झक्कास झाला. लवकरच आता तिसरा अंक सुरु होईल. दलित नवं-तरुण बाबासारखा अभ्यास करायचे सोडून कोर्टात खेटे टाकतील, आयुष्याची सोनेरी वर्षे वाया घालवतील. काँग्रेसने फेकलेल्या तुकड्यावर जगण्यासाठी आणि मंत्री-पदाचा "मेवा" खाण्यासाठी डझनभर मेवानी खालिद दिल्लीला खेटे घालतील!! नेहरूंच्या नातवाच्या दारात उभे राहून जन्म-भर कुत्र्या-प्रमाणे गोंडा घोलवतील कि काय?? अशी ा भीती वाटतेय.. संघाने निदान एका तरी ओबीसी-ला प्रधान-मंत्री केले..आणि दुसऱ्याला थेट राष्ट्रपती..!! सगळ्यांनी माझे-च विचार मानावेत आणि फक्त मीच खरा असे माझे अज्जीबात म्हणणे नाही!! (कोण-कुण्या खालिद प्रकाश मेवानी-वाणी) ण बाबांच्याच आदेशानुसार सतत नवा विचार करीत राहणे आवश्यक आहे!! (आणि काळानुसार घटना बदलणे-हि तितुकेच अत्यावश्यक आहे-च!!
                   Reply
                   1. Load More Comments