राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे यावेळी गदारोळ घालणाऱ्या सदस्याकडे पाहून ‘ए काय रे…’असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचं कामकाज चालवलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस नेमकं काय म्हणाले –
“आम्हाला संधी देतो असं तुम्ही सांगू शकता. पण तुम्ही पाहतच नाही. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ सदस्य आहेत. ते मगापासून बोलण्यासाठी उभे आहेत पण तुम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही. आमच्या अधिकाराचं हनन होत असेल आणि असं रेटून घ्यायचं असेल तर कशाला बसवता. पाठवा ना बाहेर,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदारांना गदारोळ सुरु केला असता फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहून ए काय रे असा उल्लेख करताच अजून गदारोळ सुरु झाला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “सभागृहात कसं वागायचं हे शिकवा यांना…आपण विरोधी पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही उभे आहोत, आमचा हक्क आहे. आमच्या अधिकारांचं हनन होणार असेल तर आम्ही एक मिनिटं बसणार नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis maharashtra assembly budget session sgy
First published on: 01-03-2021 at 12:24 IST